Sunday, 24 December 2017

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                    

                       स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध झेलावी लागली. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांनी भारत अनेक क्षेत्रात समर्थपणे उभा आहे. सुरक्षाक्षेत्रातही भारत मागे नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला ज्याप्रमाणे बाह्य संकटांपासून रक्षण करायचे असते त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता यांची ही काळजी घ्यावी लागते;म्हणजेच अंतर्गत सुरक्षा सांभाळावी लागते. भारताने ४ युद्ध सक्षमपणे पेलली,सैन्याच्या मदतीने सीमा सुरक्षित केल्या,सैन्य अद्ययावत ठेवलं. भारतने ह्या बाह्य आक्रमणांपासून स्वतःचा भक्कम केलाच  पण त्याच बरोबर आपल्या देशाला अंतर्गत समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. दहशतवाद,नक्षलवाद,फुटीरतावादी हिंसक चळवळी अश्या अनेक समस्या भारतासमोर आल्या.अजूनही अनेक अंतर्गत समस्यांना भारत तोंड देत आहे. आताच्या काळामध्ये समस्यांची जटीलता वाढली आहे कारण कोणतीच समस्या ही केवळ अंतर्गत किंवा बाह्य राहिली नाहीये. अंतर्गत आणि बाह्य धोके हे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच अंतर्गत समस्यांची व्याप्प्ती वाढली आहे. अंतर्गत सुरक्षेत रोज नवनवीन आव्हाने समोर येत आहेत.अश्या काळामध्ये देशासमोरील आव्हानांचा अभ्यास करणे,सतर्कता पाळणे आणि ह्या आव्हानांचा सामना करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 
       
                  नक्षलवादी चळवळ ही अंतर्गत सुरक्षेसमोरील एक मोठी समस्या आहे.'जल-जंगल-जमीन' ह्या मुद्द्यांवर १९६७ साली ही हिंसक चळवळ सुरु झाली.सद्य स्थितीमध्ये १७ राज्यातील ६०२ जिल्ह्यांपैकी १८५ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत.नेपाळ सीमेपासून पूर्व कर्नाटक पर्यंतचा पट्टा हा नक्षलग्रस्त आहे.ह्या भागाला 'रेड कॉरिडॉर' असे म्हटले जाते.दहशत बसवण्यासाठी नक्षलवादी माओ-त्से-तुंग ने सांगितलेल्या गनिमीकाव्याच्या पद्धतीने भारतीय सुरक्षा दले तसेच सरकारी यंत्रणा ह्यांवर हल्ला करतात. २००४ मध्ये अनेक कम्युनिस्ट गट एकत्र आले व त्यांनी CPI(M) ही भारतीय प्रोलेटरिएट गटाचं प्रतिनिधित्व करेल व त्याची वैचारिक मांडणी ही मार्क्स-लेनिन-माओ वादी असेल असे जाहीर केले.नववसाहतवादी,शोषण करणारे सरकार उलथवून जनतेचे(??) राज्य आणायचे व त्यासाठी सशस्त्र बंड करायचे हे त्यांचे प्रमुख राजकीय उद्दिष्ट आहे.वरकरणी बघता ही कल्पना छान वाटते.कामगार,मजूर इत्यादी कष्टकरी समाजातील तरुण हे आपल्या हक्कासाठीच चालू आहे असं समजून भुलतात,त्याचप्रमाणे काही तरुण लेनिन-मार्क्स इत्यादी कम्युनिस्ट नेत्यांच्या विचारसरणीला भुलतात व नक्षलवादाच्या क्रूर चळवळीत सामील होतात.नक्षलग्रस्त भागातील कारवायांना सुरक्षा दले प्रतिकार करत आहेतच तेथील सामान्य जनता जी अनेक वर्षांपासून विकासगंगेपासून लांब होती तिला आता मूलभूत सेवा मिळायला लागल्यामुळे नक्षलवाद्यांचा नाद सोडताना दिसत आहे.समस्या मात्र अजून संपलेली नाही.तरुणांना फूस लावून,भुलवून नक्षलवादात खेचणारे अजूनही मोठ्या संख्येने सावज हेरत आहेत.दिल्ली,मुंबई इत्यादी शहरांमध्ये शहरी नक्षलवादी शहरातील युवकांना ह्या क्रूर मार्गात आणण्याचा प्रयत्न करत आहेत,नक्षली बनण्यास प्रवृत्त करत आहेत.हे शहरी नक्षलवादी अत्यंत सहजपणे आपल्या शहरात फिरत असतात आणि कोणी तरुण सापडला कि त्याचा अंदाज घेऊन Brain Washing करतात.ज्याप्रमाणे नक्षलग्रस्त भागातील जनता सुरक्षा दलांची मदत करू लागली आहे त्याचप्रमाणे शहरी नक्षलवाद्यांच्या कारवायांबद्दल कुणकुण लागताच पोलिसांना संबंधित माहिती देणे,तरुणांना ह्या धोक्याची माहिती देणे तसेच नक्षलवाद्यांबद्दल कणव असणाऱ्यांचे,नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्यांचे खरे रूप जगासमोर आणणे हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे.
                  
                  दहशतवाद ही देखील नक्षलवाद इतकीच भीषण आणि भारताला भेडसावणारी समस्या आहे.गेले २-३ दशके आपण दहशतवादाशी झुंझत आहोत.नक्षलवादाप्रमाणेच दहशवादी देखील brain washing चा वापर करून त्यांच्या जाळ्यात तरुण ओढतात.गेल्या काही वर्षात प्रामुख्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाविषयी जागरूकता,सतर्कता नागरिकांमध्ये दिसते आहे.ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचा योगदानही आहेच.समस्येने आता एक वेगळे वळण घेतले आहे.ISIS ह्या अतिरेकी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी भारतातून तरुण लाक्षणिक प्रमाणात इराक-सीरिया मध्ये जात आहेत.अतिरेकी संघटनांकडून प्रशिक्षण घेत आहेत.ISIS सारख्या अतिरेकी संघटनेचे ट्विटर हॅण्डल चालवणारा भारतातून हे  चालवत होता ही गंभीर बाब आहे.बदलत्या काळानुसार नवीन आव्हाने जन्माला येत असतात,जुन्या समस्या नवी रूप घेत असतात.इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांनी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे समस्यांना जन्म देखील दिला.सामाजिक माध्यमांद्वारे वादग्रस्त गोष्टी करणे व समाजातील गटांमध्ये तेढ निर्माण करणे ही समस्या नवीनच उदयास आली आहे.समस्या नवीन असल्याने त्यातील बारकावे अजून नीट समोर आलेले नाहीत त्यामुळे प्रतिबंधक कायदे,यंत्रणा नीट तयार करता आलेले नाहीत.दर वेळी नवनवीन समस्या यातून निर्माण होताना दिसते.मोबाईल-कॉम्पुटर हॅक करणे,त्याद्वारे गोपनीय माहिती चोरणे,आर्थिक फसवणूक करणे ह्या गोष्टी वाढायला लागल्या आहेत.सामाजिक माध्यमांद्वारे भावनिक मुद्दे उपस्थित करून,भावना पेटवून दंगली घडवणे असल्या गोष्टीही घडायला लागल्या आहेत.इंटरनेटच्या युगात एखादा माणूस एका जागेवर बसून काहीतरी लिहून,बोलून शेकडो किलोमीटर अंतरावर दंगे घडवून आणू शकतो.अश्यावेळी कोणतीही गोष्ट फॉरवर्ड-शेअर करताना काळजी घेणं हे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.  
       
               भारत प्रचंड विविधता असलेला,क्षेत्रफळाने विस्तीर्ण देश आहे.विविधता हे वरदान असले तरी ह्या सांस्कृतिक वैविध्याचे नाव पुढे करू अनेक फुटीरतावादी चळवळी भारतात चालतात.पंजाब मधील खलिस्तान असेल किंवा ईशान्य भारतातील अनेक गट असतील हे त्या भागांमध्ये अशांतता पसरवत आहेतच.ह्या दोन प्रदेशांमधले अजून एक साधर्म्य म्हणजे अमली पदार्थांचा ह्या भागांमध्ये झालेला शिरकाव आणि त्याच्या व्यसनात बुडणारे तरुण.
   
                    बदलत्या काळानुसार सुरक्षा समस्या बदलत आहेत,नवीन जन्माला येत आहेत.ह्यामुळे समस्यांमध्ये होत असलेले बदल,नवीन समस्या आणि त्यांचा भविष्यकालीन परिणाम ह्यांचा अभ्यास फार महत्वाचा आहे.वेगवेगळ्या स्तरांवर हा अभ्यास होत असतो.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार,केंद्र-राज्य सरकारच्या गृह मंत्रालयातील अनुभवी अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्या पातळी पासून स्थानिक पोलीस स्थानकांपर्यंत ह्याचा अभ्यास,विचारविनिमय केला जातो.त्याचबरोबर देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशाच्या सुरक्षा आव्हानांची किमान माहिती असलीच पाहिजे.अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने कोणतीही असतील.नक्षलवाद असेल,फुटीरतावादी हिंसक चळवळी असतील,दहशतवाद असेल किंवा सायबर सुरक्षा,दंगली,तस्करी,हवाला,अमली पदार्थ असतील ह्या सर्वांशी लढण्यासाठी सरकारी सुरक्षा यंत्रणा तयार आहेतच पण ह्या सर्वांमध्ये एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपले-समाजाचे योगदान.सामाजिक सहकार्याशिवाय अंतर्गत सुरक्षा पूर्ण होऊच शकत नाही.सुरक्षा यंत्रणांना मर्यादा असतात,त्यांचे ठराविक कार्यक्षेत्र असते,त्यांचे संख्याबळ मर्यादित असते.ह्या मर्यादा सामान्य माणसावर नसतात.सुरक्षा यंत्रणांचे गुप्तचर खाते असतेच पण जागरूक नागरिक हा देखील गुप्तहेराइतकाच महत्वाचा आहे.एखाद्या जागरूक नागरिकाने पोलिसांना विशिष्ट गुन्ह्याबद्दल माहिती पुरवल्याने गुन्हेगारांचे बेत उधळवून लावण्यात अनेकदा पोलिसांना यश मिळाले आहे.

                    
                  सामान्य माणसांचे सुरक्षेतील काम हे फक्त पोलिसांना माहिती देणे एवढेच मर्यादित नाही.ह्या पलीकडेही अनेक गोष्टी आपण करू शकतो.शकतो.हॅरी पॉटर ह्या सुप्रसिद्ध इंग्लिश कादंबरी मध्ये जेव्हा व्हॉल्डेमॉर्ट हा शक्तिशाली-दुष्ट जादूगार पुनर्जीवित होतो त्यानंतर विद्यार्थ्यांना सावध करताना हॉगवर्ट्स शाळेचे मुख्याध्यापक डम्बल्डडोर म्हणतात- "I'm reminding you a sobering fact.Every day,every hour....this very minute perhaps...dark forces attempt to penetrate this castle's wall.But in the end their greatest weapon is you."  हीच गोष्ट आपल्या देशाबद्दल आहे.देशांतर्गत व बाहेरील अनेक विघातक शक्ती ज्या आपल्या देशामध्ये अशांतता पसरवू पाहत आहेत ते आपल्या देशातील नागरिकांचाच वापर करतात.म्हणून अश्या शक्ती ओळखून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजेच पण त्याचबरोबर या शक्तींच्या जाळ्यात फसत असलेल्यांचीही जागृती केली पाहिजे.सध्याच्या काळामध्ये अंतर्गत समस्यांना बाह्य जगातून सहकार्य मिळत असते.ह्या बाह्य शक्ती सामान्य नागरिकांकडे soft target म्हणून पाहतात.सामान्य नागरिकांनी आता एकत्र येऊन आपण soft target राहिलेलो नसून आम्हीही आमच्या देशाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहोत हे दाखवून द्यायची वेळ आली आहे.देशासमोर सामाजिक,आर्थिक,राजकीय इत्यादी कोणतीही समस्या असो ह्या समस्यांचे निर्मूलन करण्यात जनतेचा सहभाग आणि जनतेचे प्रतिनिधित्व ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत.सुरक्षा सारख्या विषयात जिथे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न असतो अश्या ठिकाणी तर आपण नागरिकांनी  सतत सतर्क व सावध राहिले  पाहिजे.
      याबद्दल महाभारताच्या शांतिपर्वामध्ये म्हटले आहे-

                न राज्यं न च राजाSSसीत्,
                न दंडो न च दण्डीकः ।
                धर्मणैव प्रजाः सर्वा,
                रक्षन्तीस्म परस्परम् ।। 

             [राज्य किंवा राजा,कोणताही दंड किंवा दंड करणारा{न्यायमूर्ती};प्रजेचे रक्षण करत नाही.प्रजा त्यांच्या धर्मामुळे{कर्तव्यांमुळे} परस्परांचे रक्षण करते.]


                                                       ©श्रवण दांडेकर 

                    
         
                  

Wednesday, 25 October 2017

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!


           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.
           


                       गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग्रामीण भागात ३२ रु. प्रतिदिन ह्या पेक्षा कमी खर्च असेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे मानण्यात येते.भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २१.९% नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत.ही संख्या प्रचंड आहे.गरिबी कमी करणं हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे.ह्या आव्हानाचे,समस्येचे उत्तर हे सखोल अभ्यासातूनच शोधले पाहिजे.उत्तर हे कायमस्वरूपी असणे महत्वाचे आहे.नाहीतर हा भस्मासूर भारताच्या विकासात कायमस्वरूपी अडथळा होऊन बसेल.
               कोणत्याही समस्येचा अभ्यास करताना त्याच्या कारणांचा अभ्यास महत्वाचा ठरतो.गरिबीची अनेक कारणे आहेत.बेकारी,शिक्षणाचा ,आरोग्याचा अभाव ही महत्वाची कारणे आहेत.गरिबी ही चक्राकार समस्या आहे.वर म्हटल्याप्रमाणे गरिबीची कारणे हीच गरिबीचे परिणाम ठरतात.गरिबीच्या अनेक कारणांपैकी आपली भरमसाट लोकसंख्या हे एक महत्वाचं कारण आहे.लोकसंख्या ही देशाची शक्ती आहे वगैरे जरी खरं असला तरी प्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या ही नक्कीच देशहिताची नाही.ही लोकसंख्या निरनिराळ्या समस्या निर्माण करते.लोकसंख्या हे बेकारी मागील एक महत्वाचे कारण आहे पण एकमेव नाही.शिक्षणाचा अभाव देखील बेकारीमध्येच परावर्तित होतो.भारतात कधी कधी अशी स्थिती दिसते की कंपन्यांमध्ये कामगार कमी पडत आहेत पण योग्य माणसे मिळत नाहीत.अशी हि स्थिती दिसते की जे काम करायला १ माणूस पुरु शकतो ते काम १० जण करतात.शेती मध्ये हे बऱ्याचदा बघायला मिळतं.ह्यामुळे १ ला मिळणाराला मोबदला १० जणांमध्ये विभागला जातो.ह्यामुळे कोणीच गरिबीतून बाहेर येऊ शकत नाही.शिक्षणाच्या अभावाप्रमाणेच आरोग्याचा अभाव हे देखील एक महत्वाचे कारण आहे.आरोग्याचा अभाव कामाचे तास,दिवस यांवर परिणाम करतो.शिक्षणाच्या अभावामुळे आधुनिक ज्ञान नसल्याने व आरोग्याच्या अभावामुळे शारिरीक स्थिती मजबूत नसल्याने कार्यक्षमता कमी होते.कार्यक्षमता कमी त्यामुळे उत्पादकता कमी,उत्पादन कमी त्यामुळे प्राप्ती कमी,प्राप्ती कमी त्यामुळे खर्च कमी आणि बचत त्याहूनही कमी!!ही सायकल चालू राहते.जे काही उत्पन्न मिळतं ते अन्न,वस्त्र ,निवारा ह्या मुलभूत गरजा भागविण्यात खर्च होतं आणि शिक्षण आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा ज्या गरिबीतून बाहेर काढण्यात मदत करू शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.व्यसनाधीनता हे देखील मोठे कारण आहे.दारू,अमली पदार्थ ह्यांच व्यसन पैसे तर संपवतच त्याच बरोबर आरोग्यही बिघडवतं.सर्वात म्हणजे ह्याचा मोठा परिणाम मुलांवर होतो.शिक्षणाचा अभाव असतो,गरिबीमुळे मजुरी करावी लागते.अश्या स्थितीत मुले लहान वयापासूनच व्यसनाधीन होतात.अजून एका पिढीची गरिबी निश्चित होते.
           काही दिवसांपूर्वी राहुल गांधी 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' असं म्हणाला होता.हे मत मात्र त्याच १००% बरोबर आहे.भारतामध्ये गरिबी ही केवळ सरकारी धोरणांमधील त्रुटीमुळे नाही तर त्या (गरीब) व्यक्तींच्या स्वभावामुळे व निष्क्रियतेमुळे ही आहे.'NO ONE IS POOR BY CHOICE!' हे जरी खर असलं तरीही माणसं निष्क्रियतेमुळेही गरीब राहतात हे सत्य आहे.शिक्षण नाही,एखाद तंत्र नाही त्यामुळे काम नाही अश्या परिस्थितीत एखादं तंत्र शिकून ते काम सुरु करणारी काही माणसं दिसतात पण बहुसंख्य सिग्नलवर,रस्त्यावर,मंदिरांजवळ भीक मागताना दिसतात किंवा आपल्या योग्यतेपेक्षा प्लंबर,सुतार,इलेक्टरेशीअन,वेटर इत्यादी काम कमी आहेत समजून बेकार बसून राहतात.ह्यामुळे इतका विरोधाभास दिसतो की एकाच दिवशी वर्तमानपत्रात बेरोजगारांचा आकडा व कामगार न मिळाल्याने कंपन्या बंद अश्या दोन्ही बातम्या येतात. ह्याचबरोबर कष्ट करण्यापेक्षा easy money मिळवण्याकडे कल असतो.          
            गरिबीची कारणे शोधत बसलो तर वेगवेगळ्या प्रकारे ती दिसत राहतील आणि परिणाम हे तर वेगवेगळे आव्हान आहे.गरिबी हे अनेक समस्यांचे महत्वाचे कारण आहे.त्यामुळे गरिबी निर्मूलन हे एक महत्वाचे काम आहे आणि हे काम एकाच बाजूने नाही तर अनेकविध बाजूंनी,अनेकांच्या प्रयत्नांनी झाले पाहिजे.स्वातंत्र्य मिळाल्या पासून ह्या साठी अनेक प्रयत्न झाले.'गरिबी हटाव' झालं,पंचवार्षिक योजनांच उद्दिष्ट गरिबी निर्मुलन झालं,राज्य-केंद्र सरकारांकडून अनेक योजना जाहीर झाल्या; परिस्थिती बदलली हे सत्य आहे पण अजूनही अनेक पाऊले पुढे जायचं आहे.

भारतातील गरिबीची स्थिती!

                 हल्लीच्या काळातील सरकारे ही नुसतीच पोलीस स्टेट नाहीत तर ही कल्याणकारी राज्य आहेत.राज्यांना अनेक काम करावी लागतात.गरिबीचे चक्र तोडण्यामध्ये सरकारला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.ह्यामध्ये सध्या सरकार शिक्षण,आरोग्य,अन्न पुरवठा इत्यादी क्षेत्रात काम करत आहे,बाकी काही क्षेत्रात सबसिडी देते.सरकार प्रत्येक वेळी गरिबी हटवण्यासाठी निरनिराळे पर्याय आजमावत असतात.सरकारने फक्त आर्थिक गरिबी वर लक्ष  भागणार नाही तर स्वभाव आणि निष्क्रियतेवरही उपाय योजले पाहिजेत. सर्वात महत्वाच म्हणजे सरकार काय ते करेल हा ऍटिट्यूड बदलून व्यक्तिगत अथवा संघटनात्मक हातभार प्रत्येकाने लावला पाहिजे.गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही गोष्ट आयती देऊ नये.त्याने विना कष्टच मिळतंय तर कष्ट का करायचे ऍटिट्यूड तयार होतो.इंसेन्टीव्ह ठेवले तर काम सोपं आणि जलद गतीने होईल.मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसावी तर ती आरोग्य,शिक्षण इत्यादी क्षेत्रात मूल्यवर्धन करणारी असावी.गरीब वस्त्यांमध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे हाती आलेला पैसा कसा?कुठे? खर्च करावा,गुंतवावा ह्या बद्दलच अज्ञान.एकूणच आर्थिक निरक्षरता ही वेगळीच समस्या आहे.त्यातून गरीब वर्गात ती समस्या ठळक जाणवते.राहण्याच्या घराची स्थिती यथातथा,स्वछता नाही पण घर बाहेर २-व्हीलर असते,त्यावरून अतिशय भयानक हेअर स्टाईल फिरणारी मुलं असतात;घरात TV असतो.पण हेच पैसे घर नीट करायला,शिक्षणासाठी,आरोग्यासाठी वापरता येतील हे कळत नाही किंवा कळूनही प्राधान्यक्रम चुकीचे असतात.ह्या गोष्टींमध्ये बदल करायलाही सरकारने आणि त्यापेक्षाही जास्त या विषयावर काम करणाऱ्या NGOs नी केलं पाहिजे.
            देशांचा सर्वांगीण विकास Human Development Index(HDI) मध्ये मोजतात.हा मोजताना सरासरी आयुर्मान,सरासरी शालेय वर्षे व दरडोई उत्पन्न या गोष्टी विचारात घेतल्या जातात. गरिबी ह्या तिन्ही गोष्टींशी  directly related आहे.त्यामुळे देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर गरिबी हटाव कार्यक्रम अधिक जोमाने,डोळसपणे हाती घ्यायला हवा,पूर्णत्वाला न्यायला हवा.यानेच आपल्या देशाचा विकास होईल,यानेच आपल्या देशासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होईल.

United Nations Sustainable Development Goals मध्ये हे गरिबी निर्मूलन हेच प्रथम उद्दिष्ट आहे.आपणही प्रथम आपल्या देशातून गरिबी निर्मूलन करून 'वसुधैव कुटुंबकम' हे वाक्य जपून सर्व जगाची मदत करूया.या संदर्भात प्रत्येकाला काय करता येईल या वर UN ने मार्गदर्शन करून ठेवलेच आहे आपण फक्त आता त्यावर मार्गक्रमण करू.                                                           ©श्रवण दांडेकर 


Monday, 2 October 2017

समस्या भारतासमोरच्या!
              भारत स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली.७० वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली.१५ ऑगस्ट १९४७ च्या तुलनेत आपण बरेच पुढे आलो आहोत पण अजूनही अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत.यातील अनेक समस्यांशी अनेक वर्ष सामना करूनही अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.याची कारणे काय?समस्याच मोठ्या जटील आहेत?की त्या सोडवण्यात प्रयत्न कमी पडतायत?की आपण नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखल्याच नाहीयेत?की वैयक्तिक स्वार्थ साठी या समस्या तश्याच कुजवत ठेवायच्या आहेत?
                भारतासमोरच्या नेमक्या समस्या कोणत्या याचा विचार करताना मला अनेक समस्या सुचल्या.यातील काही एकमेकांशी जोडता येतील,अनेकवेळा एका समस्येचं मूळ दुसर्या समस्येत सापडेल.काही खूप महत्वाच्या,काही कमी महत्वाच्या छुल्लक वाटतील पण ह्या सर्व समस्या सुटतील तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.
          ह्या समस्या लिहताना कोणताही criteria ठेवलेला नाही.Brain Storming करत सुचत गेल्या तश्या लिहिल्या आहेत.
  
        भारतासमोरच्या समस्या!!   
1. गरिबी.
2. आरोग्य.
3. शिक्षण.
4. आर्थिक साक्षरता.
5. राजकीय साक्षरता.
6. शेती आणि अन्न सुरक्षा.
7. रोजगार.
8. अंधश्रद्धा.
9. जातीयवाद.
10. असहिष्णुता?
11. महिला सबलीकरण.
12. महिला सुरक्षा.
13. न्यायालयीन शिथिलता.
14. अंतर्गत सुरक्षा.
15. सीमा सुरक्षा.
16. नक्षलवाद.
17. काश्मीर.
18. प्रादेशिक अस्मिता.
19. भ्रष्टाचार.
20. बेकायदेशीर कृत्य.
21. प्रदूषण.
22. पाणी.
23. जंगलांचा ह्रास.
24. जैवविविधतेचा ह्रास.
25. अस्वच्छता.
26. ऊर्जा.
27. राजकारण.

       ह्यात माझ्याकडून काही समस्या राहिल्या असतील,तर त्या कमेंट मध्ये लिहा.वरील लिहिलेलेल्या समस्यांचा अभ्यास करून काही लेख लिहावे असं डोक्यात आहे.समस्यांचं मूळ कारण,त्यांची सद्यस्थिती,त्यांवरचे उपाय शोधावेत आणि या सर्व गोष्टींची मांडणी करावी अशी कल्पना आहे.प्रत्येक समस्येत काही inputs मला द्यावेत अशी इच्छा आहे,कारण प्रत्येक समस्येकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो आणि या वेगवेगळ्या दृष्टीकोनातूनच उत्तरे निघतील असं मला वाटत.तरी कृपया आपल्याला जी समस्या जास्तीतजास्त त्रास देत असेल त्या विषयी काही मुद्दे नक्की मांडा.
             धन्यवाद!!!
                                                                ©श्रवण दांडेकर😃
                                          

Saturday, 27 May 2017

पाकिस्तानच करायचं काय??

                 १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.भारताची फाळणी होऊन पाकिस्तान तयार झाला.तेव्हा पासून दोन देशांमध्ये कायमच संघर्षाचे  संबंध राहिले आहेत.पाकिस्तान कायमच भारताच्या कुरापती काढत कुरघोडी करायचा प्रयत्न करतो.हा कायम चालणाऱ्या संघर्षाचे रूपांतर तीन युद्धांमध्ये झाले.तिन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानला भीषण हार पत्करायला लागली असली तरी कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच या म्हणी प्रमाणे पाकिस्तान काही सुधारायला तयार नाही.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन ही नेहमीचीच बातमी झाली आहे.दहशतवादाला खतपाणी घालणे,घुसखोरी,भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना अशा अनेक बातम्या ऐकल्या की कायम प्रश्न पडतो की या पाकिस्तानचं करायचं काय??
         
         पाकिस्तान बरोबर भारताच्या दोन प्रकारच्या सीमारेषा आहेत.एक म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमारेषा-जी गुजरात,राजस्थान,पंजाब आणि जम्मू-काश्मीर चा काही भाग अशी आहे आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा-(Line Of Control-LoC).फाळणी नंतर पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना युद्धबंदी लागल्यानंतर काश्मीरचा गिलगीट-बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानच्याच ताब्यात राहिला.ह्या भागालाच पाकव्याप्त काश्मीर म्हणतात.भारत-पाकिस्तान सीमावाद हा प्रामुख्याने ह्या कारणावर आहे;त्याच बरोबर सियाचीन हिमनदीच्या अति दुर्गम भागावर पाकिस्तान आपला अधिकार सांगत आहे.त्याचप्रमाणे सर क्रीक ह्या भागावरून सुद्धा वाद आहे.१९६५,१९७१,१९९९ अश्या तिन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानला हार पत्करायला लागली असल्याने आता पाकिस्तान Proxy War(छुपे युद्ध)चा मार्ग वापरायला सुरवात केली आहे.युद्धापेक्षा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सैन्यावर,चौक्यांवर लपून गोळीबार करणे,दहशतवादी घुसखोर घुसवणे,हुर्रियत-हिजबुल सारख्या फुटीरतावादी संघटनांना मदत करणे,इतर दहशतवादी संघटनांना मदत करणे असे पर्याय वापरून पाकिस्तान भारतात अशांतता पसरवत आहे. 
           पाकिस्तानी सैन्याने नोव्हेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या एका वर्षाच्या कालावधीत साधारण ४५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.आंतरराष्ट्रीय सीमारेषा,प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या दोन्ही ठिकाणी अश्या प्रकारचा गोळीबार पाक सैन्य वारंवार करते.पाकिस्तानच्या अश्या कुरापतींमुळे सियाचीन सारख्या प्रचंड अवघड,मानवी राहणीस प्रतिकूल अश्या ठिकाणी सुद्धा भारताला सैन्य तैनात करावे लागले आहे.७४ किमी. लांबी असलेला सियाचीन हिमनद आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र हे पूर्णपणे भारताच्या हद्दीत असूनही पाकिस्तान ह्या भूभागावर आपला हक्क सांगत आहे.या भूभागाच्या दुर्गमतेमुळे आणि त्याच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या कोणत्याही करारामध्ये या भागाचा स्पष्ट उल्लेख नाही.१९४९ साली झालेल्या भारत-पाक करारामध्ये युद्धबंदी रेषा ठरवण्यात आली त्यात श्योक नदीजवळच्या NJ1942 या शिखरापर्यंत सीमा ठरवून परिसराच्या दुर्गमतेमुळे 'Thence north to the glacier' असे संदिग्ध शब्द वापरण्यात आले.१९६२ च्या पाक-चीन करारामध्ये पाकिस्तानने सियाचीन ग्लेसियर च्या उत्तरेकडील मोठा भाग परस्पर चीन ला देऊन टाकला.भारत-चीन युद्धात चीन ने बळकावलेला अक्सई चीन भाग एका बाजूला,उत्तरेला पाकिस्तान ने चीन ला दिलेला भाग आणि दुसऱ्या बाजूला पाकव्याप्त काश्मीर अश्या परिस्थितीमुळे सियाचीन क्षेत्राला मोठे सामरिक महत्व आहे.इथे सैन्य ठेवण्यात प्रचंड खर्च येतोच त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक सैनिक शहीद होतात वा गंभीर जखमी होतात.तिथल्या निसर्गाचा ह्रास ही वेगळीच बाब आहे.ह्या सर्व गोष्टीमुळे कायमच सियाचीन मधून सैन्य हटवण्याची मागणी होत असते.दोन्ही देशांनी सैन्य मागे घेऊन तिथे सियाचीन पीस पार्क उभारण्यात यावं अशी कल्पना आहे.पाकिस्तानची विश्वासार्हता ० आहे आणि भारताने सैन्य काढल्यास चीन आणि पाकिस्तान साठी आयता कॉरिडॉर तयार होईल.त्यामुळे जो पर्यंत पाकिस्तान त्यांचे पूर्ण सैन्य या भागातून काढत नाही तो पर्यंत भारताने सैन्य काढणे ही मागणीच गैरव्यवहार्य ठरते. 
              भारत-पाकिस्तान सीमावादात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो सर क्रीक ह्या समुद्रधुनीचा(Strait).या समुद्रधुनीच्या जवळपासच्या ९००० स्क्वेअर किमी भागावर पाकिस्तान हक्क सांगत आहे जो भारताने स्पष्टपणे नाकारला आहे.ह्या समुद्रधुनीमुळे गुजरातमधील कच्छचे रण आणि पाकिस्तानमधील सिंध प्रांत वेगळे होतात.समुद्र असल्याने ह्या भागावर सीमारेषा अधोरेखित करणे अवघड काम आहे.१९६५ मध्ये झालेले भारत-पाकिस्तान युद्ध हे ह्या सर क्रीक च्या मुद्द्यावर झाले.१९६५ च्या युद्धानंतर हा वाद मिटवण्यासाठी इंग्लडने मध्यस्थीचा प्रयत्न केला.इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन ह्यांनी एक आयोग नेमला.ह्या विल्सन आयोगाने पाकिस्तानने दावा केलेल्या भागांपैकी १०% भाग पाकिस्तान ला दिला.हा १०% च भाग पाकिस्तानच्या हद्दीत येत असल्याने आयोगाने पाकिस्तानची ९००० स्क्वेअर किमी ची मागणी फेटाळली.नाराज पाकिस्तानने हा निवाडाच अमान्य केला.१९६५ पासून २०१५ पर्यंत ८ वेळा ह्या मुद्द्यावर चर्चा झाल्या मात्र तोडगा काढण्यात कायमच अपयश आलेला आहे.
सर क्रिक 


सियाचीन 


          एवढे सीमावाद असणारा,कायम कुरापती करणारा आणि दहशतवादाला मदत करणारा देश शेजारी असला की त्याला हाताळण्यासाठी प्रामुख्याने तीन पर्याय देशासमोर असतात ते म्हणजे-
 • युद्ध 
 • चर्चा 
 • आंतरराष्ट्रीय दबाव/आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडणे(Isolation)
    यातील युद्ध हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे आणि तो शक्य तितका टाळला पाहिजे.एकाच्या बदल्यात दहा हे भावनेच्या भरात बोलणं ठीक आहे किंवा 'पाकला करा खाक' असा काहीतरी विषय घेऊन न्यूज चॅनेल वर फड रंगवणे ठीक आहे पण व्यवहार्य नाही.भारताचे लष्कर सामर्थ्यशाली असले तरी युद्धाने जो आर्थिक ताण अर्थव्यवस्थेवर येतो तो सहन करण्याची ताकद अर्थव्यवस्थेत आहे का?आणि विकासाच्या ज्या टप्प्यावर भारत आज उभा आहे,जिथे GDP Growth Rate 7.6% आहे,अश्या स्थितीमध्ये युद्ध करून मोठा खर्च करणे हे हितावह नाही.दुसरी आणि फार महत्वाचा मुद्दा आहे दोन्ही देशांच्या अण्वस्त्र सज्जतेचा.दोन्ही देशांनी NPT(Non-Proliferation Treaty-अण्वस्त्र प्रसार बंदी)आणि CTBT(Comprehensive Test Ban Treaty-सर्वंकष अण्वस्त्र परीक्षण बंदी)या दोन करारांवर सही केलेली नाही.भारताने अण्वस्त्रांसंबंधी No First Use Policy स्वीकारली आहे,NPT/CTBT करारांवर भारताने सही जरी केली नसली तरी कोणत्याही देशाला अण्वस्त्र तंत्रज्ञान देणार नाही व अण्वस्त्र परीक्षण करणार नाही अश्या भूमिकांमुळे भारताची एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळख आहे.पाकिस्तानने या करारांवर सही तर केलेली नाहीच आहे आणि No First Use असे काही पाकिस्तानचे धोरण नाही.पाकिस्तानने किमान ५० वेळा अण्वस्त्र वापरायची धमकी दिलेली आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये अण्वस्त्रांचा ताबा हा लष्कराकडे आहे,भारताप्रमाणे सरकार कडे नाही.अश्या परिस्थितीत युद्ध कोणते रूप घेईल हे सांगता येत नाही.अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे युद्धाने प्रश्न संपेल याची शाश्वती काय?बऱ्याचदा युद्धाने प्रश्न सुटत नसतात तर नवीन निर्माण होत असतात.युद्धाने तात्कालिक शांतता येईल पण त्याच शांततेत पुढच्या युद्धाची बीजे रोवली जातात.त्यामुळे युद्ध हा पर्याय टाळायलाच हवा.सीमापार गोळीबाराला गोळीबार व मिलिटरी ऑपरेशन ने प्रत्युत्तर मात्र द्यायलाच हवं.


            भारताला पाकिस्तान वर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणायचा असेल तर अमेरिका,सौदी अरेबिया आणि चीन ही ३ राष्ट्रे फार महत्वाची आहेत कारण पाकिस्तानला जास्तीतजास्त आर्थिक आणि इतर मदत ही याच तीन देशांकडून मिळते.अमेरिका आता अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेत असल्याने अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्व कमी झाले आहे.त्यामुळे अमेरिकडून पाकिस्तानकडे येणार मदतीचा ओघ कमी होताना दिसत आहे.दुसऱ्याबाजूला चीन चा आशियात आणि पॅसिफिक मध्ये वाढणारा प्रभाव अमेरिकेला खुपत आहे.हा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका भारत हाच पर्याय समोर आहे,त्यामुळे अमेरिकेच्या बाजूने पाकिस्तान वर दबाव आणणे भारताला जमू शकते.सौदी अरेबिया शी भारताचे राजनैतिक संबंध असले तरी ते पाकिस्तान वर दबाव आणण्याएवढे नाहीत.सौदी अरेबिया शी संबंध वाढवून हा मार्ग वापरता येऊ शकेल.चीन आणि पाकिस्तानचे संबंध हे सध्या फारच सलगीचे आहेत.चीन पाकिस्तानला हरप्रकारे मदत करत आहे.CPEC(China-Pakistan Economic Corridor) ह्या दोन्ही देशांमधला महत्वाकांक्षी प्रकल्पात चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.चीन पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादार बंदराचा विकास करत आहे.UNSC(United Nations Security Council) च्या मसूद अजहर ला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या ठरावाला चीन ने नकाराधिकार वापरला.पाकिस्तानवर दबाव आणण्यात व त्याला एकटे पाडण्यात चीन हाच सर्वात मोठा अडथळा आहे.१५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरच्या भाषणात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान मध्ये जनतेवर होत असलेल्या अत्याचारांचा उल्लेख केला.नेहमी काश्मीर मध्ये भारतीय लष्कर नागरिंकावर अत्याचार करत आहेत असा आरोप पाकिस्तान सतत करतो,त्याला उत्तर देताना बलुचिस्तानचा मुद्दा महत्वाचा आहे.मुद्दा अजून जरी प्राथमिक स्तरावर असला तरी ह्या मुद्द्याचा पाकिस्तानवर दबाव आणण्यात वापर करता येईल.अश्याच प्रकारचा मुद्दा हा गिलगिट-बाल्टिस्तान बद्दल पण वापरात येऊ शकतो.मार्च २०१७ मध्ये इंग्लंड च्या संसदेने गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग भारताचा असून पाकिस्तानने तो बेकायदेशीररित्या बळकावला आहे असा ठराव पास करून पाकिस्तानच्या ह्या भागाला त्यांचा प्रांत ठरवण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला आहे.अशा काही घटनांचा पाकिस्तान वर दबाव आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो.पाकिस्तान वर दबाव आणण्यासाठी सर्वात मोठं आणि महत्वाचं भारताकडे असलेलं साधन म्हणजे सिंधू पाणी करार(Indus Water Treaty).या करारानुसार भारत जेवढ पाणी वापरू शकतो तेवढं पाणी भारत वापरत नाही आहे.३ युद्धांच्या काळातही भारताने हा करार  पाळला आहे.असं असलं तरीही पाकिस्तानच्या मनात भारत सिंधू आणि इतर नद्यांचे पाणी अडवेल अशी भीती असते.त्यामुळे प्रत्यक्ष करार जरी मोडीत काढला नाही तरी करार संपवू असं म्हणत पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवता येते.
             पाकिस्तानवर अश्या प्रकारे दबाव ठेवून दुसऱ्या बाजूला चर्चा केली पाहिजे.काश्मीर सारखा अतिसंवेदनशील विषय व्यवस्थित हाताळण्यात यावेत पण त्या आधी सियाचीन,सर क्रिक आणि इतर वादांवर तोडगा काढण्यात यावा अशी भारताची भूमिका होती.पाकिस्तानची मात्र कायम काश्मीरच्याच चर्चेची अट असायची.२००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने आधी दहशतवाद विरोधी कारवाई नंतर चर्चा अशी अट ठेवली.या नंतर भारत-चर्चा प्रक्रिया थंडावली.पाकिस्तानचे भारत विषयी धोरण फक्त सरकार ठरवत नाही तर त्यात पाकिस्तानी लष्कर व तेथील धार्मिक गट यांचाही मोठा वाट असतो.ह्या लष्कर आणि धार्मिक गट यांच्या प्रभावामुळे पाकिस्तानची दहशतवाद प्रकरणी भूमिकाही कायम दुट्टपी स्वरूपाची दिसते.वास्तविकतः पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची मोठी किंमत भोगावी लागली आहे.पेशावर मध्ये शाळेत झालेला भीषण हल्ला असो व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्त्या किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळांवर दहशतवाद्यांनी केलेले हल्ले स सगळ्यातून पाकिस्तानचंही खूप नुकसान झालेले आहे.तरीही पाकिस्तान Good Terrorism-Bad Terrorism असा स्वतःच्या भल्याचा(?) भेद करत आहे.पाकिस्तानसाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादास वाईट दहशतवाद ठरवून पाकिस्तानी लष्कराने वजिरीस्तान आणि FATA-Federally Administrated Tribal Area या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे मात्र भारत व इतर देशांमध्ये कारवाया करणाऱ्या दशतवाद्यांना चांगले दहशतवादी असे लेबल लावून त्यांना आसरा,मदत पुरवत आहे.मुंबई वरील हल्ल्याचे पाकिस्तानमध्ये बसून नियोजन करणारे हाफिज सईद,झाकी-उर रहमान लखवी ह्या दोघांवरतीही भारताने पुरावे देऊनही पाकिस्तान खटला चालवण्यात उत्साही दिसत नाही.पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI भारताविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन देतात.पाकिस्तानच्या राजकारणावर लष्कराचा चांगलाच प्रभाव आहे.२००८-१३ असा ५ वर्षांचा कालावधी झारदारींनी पूर्ण केल्यानंतर २०१३ च्या निवडणुकीत बहुमत असलेल्या नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग कडे सत्ता आली.पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका लोकशाही सरकारने दुसऱ्या लोकशाही सरकार कडे सत्ता  केली.या वरूनच लष्कराचा किती पगडा अंतर्गत राजकारणात आहे ते कळते.
              इंद्रकुमार गुजराल परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी प्रथम व्यापार संबंध सुधारून त्यातून विश्वास निर्मितीची प्रक्रिया सुरु करावी ज्याचा उपयोग राजकीय विश्वास निर्मितीमध्ये होईल असे सूत्र सांगितले होते.भारत पाकिस्तान दरम्यान आजमितीस साधारण ३ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यवहार चालतो.हा व्यवहार सुरळीत चालू राहिल्यास २-३ वर्षातच १५ अब्ज डॉलर चा टप्पा गाठू शकतो.भारत पाकिस्तानला अंदाजे ७००० वस्तू निर्यात करतो मात्र पाकिस्तान कडून तेवढ्या प्रमाणात भारत आयात करत नाही.त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार असमतोल आहे.काही वस्तूंवर दोन्ही देशांनी निर्बंध घातले आहेत तसेच वस्तूंवर लागणारी जकात मोठी आहे.भारताने पाकिस्तान ला Most Favoured Nation चा दर्जा दिला आहे.पाकिस्तान ने सुद्धा भारताला तो दर्जा दिला तर बऱ्याचश्या समस्या सुटू शकतात.पण यात येणारी समस्या हि सुद्धा पाकिस्तानच्याच बाजूने आहे.पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व भारताबरोबर आर्थिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत.पाकिस्तानी लष्कराला मात्र हे संबंध नको आहेत.पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानी लष्कर हे भारत-पाकिस्तान  यांच्यातील व्यापारी संबंधातील सर्वात मोठा अडथळा आहे अश्या स्वरूपाचे विधान केले.भारताबरोबर व्यापारी संबंध सुधारले तर भारताचा पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि मध्य आशियात प्रभाव वाढेल अशी पाक लष्कराची भीती आहे.या मुळेच पाकिस्तानी लष्कर सातत्याने व्यापारी संबंधांना विरोध करत आहे.पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाने लष्करी दबावापुढे न झुकता व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.पाकिस्तानी जनताच पाकिस्तानवरचा लष्करी प्रभाव कमी करू शकते.व्यापार संबंधातून होणारी विश्वासनिर्मिती प्रक्रिया हीच काश्मीर,सियाचीन आणि सर क्रिक अश्या समस्या सोडवण्यात उपयोगी ठरेल.
 
 
        १९९९ युद्धानंतर वाजपेयी सरकारने भारत-पाक चर्चा आणि शांतता प्रक्रियेला सुरवात केली.वाजपेयींनी त्यांच्या ५ वर्षाच्या काळात २ वेळा पाकिस्तानला भेट दिली.याच काळात त्यांनी लाहोर करार घडवून आणला,कारगिल युद्धाचा दोष नवाज शरीफ यांना न देता लष्कराला दिला.वाजपेयींनी सुरु केलेले हे शांतता धोरण मनमोहन सिंग यांनी चालू ठेवले.या काळात झालेले दहशतवादी हल्ले,शस्त्रसंधी उल्लंघन यांमुळे बऱ्याचदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली पण परिस्थिती चिघळणार नाही याची विशेष काळजी मनमोहन सिंग यांनी घेतली.२००८ मुंबई हल्ल्यानंतर भारताने टेरर अँड टॉक एकत्र होणार नाही अशी भूमिका घेतली आणि भारत-पाक चर्चा प्रक्रिया थंडावली.नरेंद्र मोदी यांनी शेजारील देशांशी संघर्षांचे नव्हे तर सलोख्याचे आणि शांततेचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत असे संकेत दिले.मोदी यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना त्यांच्या शपथविधी साठी आमंत्रण दिले.याच शपथविधी सोहळ्यात शरीफ-मोदी भेट झाली.उच्चायुक्त स्तरावरची भेट ठरलेली असताना पाकिस्तानी उच्चयुक्तांनी काश्मीर मधील फुटीरतावाद्यांची भेट घेतली परिणामी भारताने हि बैठक रद्द केली.नरेंद्र मोदींनी एकदा पाकिस्तान ला अचानक धावती भेट दिली,क्रिकेट डिप्लोमसी चा सुद्धा वापर झाला.या सगळ्यात एक गोष्ट कायम दिसते ती म्हणजे जेव्हा जेव्हा भारत-पाक शांतता चर्चा सुरु होते वा सुरु व्हायची चिन्ह दिसतात त्या त्या वेळी पाकिस्तानी लष्कर गोळीबाराला सुरुवात करते किंवा लष्कर-ISI पुरस्कृत दहशतवादी गट हिंसक कारवाया करतात.चर्चा प्रक्रिया थांबणे हाच पाकिस्तानातील भारतविरोधी तत्वांचा विजय आहे.चर्चा प्रक्रियाच थांबली तर कोणताच तोडगा निघणार नाही आणि परिस्थिती कायम आहे तशीच राहील.एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तान समस्या आणि पाकिस्तान बरोबर असणारे प्रश्न हे फक्त आणि फक्त चर्चेनेच सुटू शकतात.
             सध्या पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन,पाक पुरस्कृत दहशतवादी,फुटीरतावाद्यांच्या काश्मीर खोऱ्यातील कारवाया त्यात जाणारे सैनिक आणि नागरिकांचे बळी;कुलभूषण जाधव ह्या माजी भारतीय नौदल अधिकाऱ्याला बेकायदेशीररीत्या पकडून फाशीची शिक्षा देणे,भारतीय अधिकार्र्यांना त्यांच्याशी संपर्क साधू न देणे अश्या कारणांमुळे भारतात पाकिस्तान विरुद्ध तीव्र भावना आहेत.न्यूज चॅनेल युद्धाकडे TRP साठी मोठा event या नजरेने बघतायत असच वाटत.भावनेच्या भरात केलेली कृत्य व्यवहार्य असतातच असं नाही त्यामुळे चर्चा आणि चर्चाच हा व्यवहार्य उपायच long term फायदा देईल हे लक्षात घ्याल हवं.हे सर्व लक्षात घेऊन दोन्ही सरकारांनी भविष्यकालीन शांततेसाठी आणि विकास साधण्यासाठी बंद पडलेली शांतता चर्चा प्रक्रिया चालू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.चर्चेतून निघालेला तोडगा कायम शांतता प्रस्थापित करेल आणि दोन्ही देश विकासमार्गावर घोडदौड अधिक वेगाने करू शकतील.
                                                                                                                                                             ©श्रवण दांडेकर
                                                              
             

Monday, 13 February 2017

The High Functioning Sociopath!!

                  


           गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!            
            ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी 'अ स्टडी इन स्कार्लेट'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं केलं.स्ट्रॅन्ड चा खप शेरलॉक मुळे प्रचंड वाढायला लागला.शेरलॉक ला प्रचंड यश मिळत असताना सर डॉयल मात्र लोकांना शेरलॉक सोडून आपल्याकडून काही नकोय म्हणून वैतागून गेले होते.आपण म्हणजे शेरलॉक या समीकरणातून बाहेर  पडण्याचा विचार करत असताना त्यांना स्वित्झर्लंडला उपाय सापडला.स्ट्रॅन्ड मधून प्रसिद्ध झाली 'द फायनल प्रॉब्लेम.' यात जिम मॉरीयार्टी या  क्रिमिनल मास्टरमाईंड शी लढताना शेरलॉक दरीत कोसळून मृत्युमुखी पडतो.या घटनेनंतर स्ट्रॅन्ड चे एका दिवसात २२००० वर्गणीदार कमी झाले.सर्वत्र सर डॉयल यांनी परत शेरलॉक लिहावं या साठी प्रयत्न चालू होते.अगदी इंग्लंडच्या राणीने देखील प्रयत्न केले पण सर डॉयल सगळीकडे दुर्लक्ष करून स्वित्झर्लंड मध्ये बसले होते.अखेर ७ वर्षानंतर सर चाहत्यांच्या दबावाखाली झुकले आणि पुढची कथा आली-'एमटी हाऊस'  शेरलॉक होम्स जिवंत!!तो मेलाच न्हवता.या नंतर शेरलॉक च्या कथा येतच राहिल्या. 'हिज लास्ट बो' हि सर आर्थर कॉनन डॉयल यांची शेवटची शेरलॉक कथा.१८५७ मध्ये २५ पौंड्स मानधन मिळालेल्या सर डॉयल ना १९०३ मध्ये १३ कथांच्या संग्रहाला तब्बल ४५००० पौंड्स मानधन मिळालं!!सर डॉयल यांनी शेरलॉक लिहणं थांबवलं मात्र त्यांच्या या मानसपुत्राचा दबदबा एवढा वाढला होता की त्यांच्या या कथांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये तर झालेच पण अनेक लेखकांनी शेरलॉक वर अनेक पुस्तके लिहली.सर डॉयल यांच्या मुलाने डॉ.वॉटसन ने उल्लेख केलेल्या पण प्रकाशित न झालेल्या होम्सकथा 'THE EXPLOITES OF SHERLOCK HOLMES' या पुस्तकातून प्रसिद्ध केल्या. 
सर आर्थर कॉनन डॉयल 
                         

          शेरलॉक ही काल्पनिक व्यक्तिरेखा नसून आर्थर कॉनन डॉयल यांचच एक रूप आहे असा अनेकांचा विश्वास होता.त्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन यायचे.शेरलॉक लिहायच्या आधी सर डॉयल यांनी ३६ वर्ष Science Of Deduction चा स्वतः अभ्यास केला होता.अनेक गुन्हेगारीच्या-गुंतागुंतीच्या केसेस मध्ये त्यांचा मत महत्वाचं मानलं जायचं.कुत्र्यांचा माग काढण्यासाठी उपयोग,ठसे घेण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस चा उपयोग,बोटांचे ठसे,सिगार ची राख,टायर चे छाप,मानवी रक्ताची तपासणी,कपड्यांचे धागे-त्यात अडकलेली धूळ या सगळ्यांचा वापर आजही पोलीस-गुप्तहेर संस्था करतात या सर्वांचं मूळ हे या शेरलॉक मध्ये आहे.चीन-इजिप्त सारख्या अनेक देशांमध्ये पोलीस प्रशिक्षणामध्ये शेरलॉक होम्स चा आणि त्याच्या Science Of Deduction चा वापर केला जातो.
Principal of Science Of Deduction 
                     

                पुस्तक-कथा एवढ्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेरलॉक ला दृश्य स्वरूपात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.१९१६ मध्ये शेरलॉक वर पहिला चित्रपट आला.तेव्हा पासून ते आत्ताच्या रॉबर्ट डाउनी ज्युनिअर च्या शेरलॉक पर्यंत साधारण ३०-३५ सिनेमे आले.यातले काही कथांवर आधारित आहेत तर काहींमध्ये बदल करून मॉडिफिकेशन्स केली आहेत.सिनेमा मध्ये सर्व काही पूर्ण होत न्हवत आणि यातूनच १९५४ मध्ये शेरलॉक TV वर आला.३९ भागांच्या या सिरीज मध्ये सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या कथा दाखवण्यात आल्या.त्यानंतर १९६५ मध्ये BBC ने शेरलॉक सिरीज आणली.मग १९८३ मध्ये अजून एक सिरीज.या सगळ्या सिरीज मध्ये कथा होत्या तशाच,जुन्या काळात दाखवल्या. 
Add caption

                           Sherlock Holmes 1954 Series
                                   Sherlock Holmes 1983                              
                        
                                     २०१० मध्ये BBC ने SHERLOCK सिरीज सुरु केली.यातील कथा या  Based on work of Sir Arthur Conan Doyle आहेत.शेरलॉक हा सुद्धा २०१० मध्ये आलाय.सुरवातीला हे एपिसोड बघायच्या आधी वाटलेलं की याला काय अर्थ शेरलॉक म्हणजे त्याच काळात पाहिजे,त्याच गोष्टी पाहिजेत पण ही सिरीज पण तेवढीच किंबहुना आधीच्यांपेक्षा जरा जास्तच भारी झाल्ये.उत्कृष्ट दिग्दर्शन,सर्व कलाकारांचे जबरदस्त अभिनय,संवाद,कथेत केलेले काही बदल-आत घातलेल्या नवीन गोष्टी आणि background music यांमुळे शेरलॉक ची ही सिरीज कितीही वेळा बघितली तरी कंटाळा येत नाही.या सिरीज मध्ये जिम मॉरीयार्टी हा Central Villian म्हणून दाखवण्यात आलाय.आता पर्यंत ४ सिझन प्रचंड वेळ काढून BBC ने आणलेले आहेत.प्रत्येक सिझन मध्ये दीड-दीड तासांचे ३-३ एपिसोड आहेत.
                                 

शेरलॉक ची ही सिरीज आणि ओरिजिनल कथा नक्की वाचा.शेरलॉक च्या तोंडचे Quotes त्याचे संवाद हे एका वेगळ्याच लेव्हल चे आहेत.जे  पुस्तकात तर बरेच आहेत.
                   
                  शेरलॉक.एका माणसाच्या कल्पनेतील व्यक्तिरेखा एवढी प्रसिद्ध होते.जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद होतात.ही व्यक्तिरेखा जिथे तयार झाली,पहिल्यांदा प्रसिद्ध झाली तो देश शेरलॉक चा इतिहास सांभाळतो.आधी काल्पनिक असणारा  221 B Baker Street  हा पत्ता अस्तित्वात आला.तिथे आता शेरलॉक होम्स म्युझिअम आहे.शेरलॉक होम्स संबंधीच्या सर्व गोष्टी तिथे जपून ठेवल्या आहेत.     
                          शेरलॉक कडे  एक व्यक्ती म्हणून बघितलं तर हा तसा माणूसघाणा.डॉ.वॉटसन सोडून कोणी मित्र नाही.कायम कसले ना कसले प्रयोग करत राहणारा,ड्रग्स शौकीन.स्वतः सोडवलेल्या गुन्ह्यांच श्रेय दुसऱ्यांना हसत हसत देणारा,समाजातील दुर्जनांना त्यांच्याच पद्धतीने समजावणारा,प्रचंड बुद्धिमान Sociopath!!
                        शेरलॉक १८५७ पासून लोकांचं मनोरंजन करत आला आहे.अजून अनेक वर्ष करेल.माणसांचा कंटाळा घालवत राहील,मोठ झाल्यावर गुप्तहेर बनायचं असा स्वप्न लहान मुलांना दाखवत राहील,मोठ्यांना बालपणाची आठवण करून देत राहील,गुप्तहेरांना मार्गदर्शन करत राहील,गुन्हेगारांना तुम्ही किती प्रयत्न केलेत तरी काहीतरी मागे ठेवाल सांगत राहील,लेखकांना शेरलॉक सारखं जगप्रसिद्ध काहीतरी लिहावं या साठी प्रेरणा देत राहील,शेरलॉक अमर राहील!! 
                                                     तुम्ही शेरलॉक वाचलायत ना??वाचला असाल तर आवडती केस टाका कॉमेंट मध्ये!!बघितला असेल तर एपिसोड सांगा!!वाचला असेल तर आता बघा पण आणि बघितला असेल पण वाचला नसेल तर आवर्जून वाचा!!दोन्ही केला नसेल तर आधी वाचा मग बघा!!चर्चा करूच  म !!
                                                                                              
                                                                                                                                              धन्यवाद!!
                                                                                                                                ©श्रवण दांडेकर 


Monday, 26 December 2016

Be Lesscash!!

  

            
                               Demonetisation झालं आणि भारतात कॅशलेस इकॉनॉमी चे वारे वाहायला सुरवात झाली.पंतप्रधानांनी देखील कॅशलेस व्हायचे नारे दिले.पण कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे नक्की काय?? नक्की करायच काय?? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं-शंकानिरसन करण्यासाठी हा लेख.

  

  कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय??भारतात शक्य आहे का??

           कॅशलेस इकॉनॉमी अशी इकॉनॉमी ज्यात जास्तीतजास्त व्यवहार हे कार्ड वा डिजिटल मेडीयम होतात.थोडक्यात काय तर कुठेही डायरेक्ट कॅश मध्ये पैसे द्यायचे नाहीत.कॅश कमीतकमी वापरायची.पुढचा प्रश्न महत्वाचा ठरतो की हे भारतात शक्य आहे का??तर हो.नक्कीच होऊ शकत.प्रत्येक गोष्टीच्या सुरवातीच्या काळात गोष्टी अवघड,अशक्य वाटतात पण नंतर सवय होते आणि होऊन जातं.तसच हे हि होईल.आणि कोणतीही मोठी गोष्ट करताना २ गोष्टी फार महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि जनसहभाग.या दोन्हीच्या सहकार्याने भारत नजीकच्या भविष्यकाळातच एक यशस्वी लेसकॅश इकॉनॉमी तर नक्कीच होऊ शकतो.

 कॅशलेस व्हायचा कसं??

           साधारणपणे मनात येणारा प्रश्न.तुमच बँक अकाउंट आहे,कॅशलेस इकॉनॉमी साठी पहिल पाऊल.अकाउंट बरोबर ATM कम डेबिट कार्ड असेल तर काम अजून सोप आणि जर तुमचा मोबाइल नंबर जर अकाउंट शी जोडला असेल तर आता कॅशलेस होण्यात काहीच अडचण नाही.तसेच सध्या अनेक बॅंक्स आणि काही खासगी कंपनी मोबाइल वॉलेट (उदा-Paytm,Freecharge,SBI Buddy etc.) सुविधा पुरवतात.अश्या अनेक पर्यायांचा वापर करून आपण लेसकॅश होऊ शकतो.

  कॅशलेस व्यवहार कसे करायचे??


 • बँकेच्या मदतीने व्यवहार-  आपण काही व्यवहार हे कॅशलेस करतच आलो आहोत.यांच प्रमाण मात्र आता वाढायला हवं.उदा.-चेक पेमेंट,DD,NEFT ,RTGS  अश्या बॅंक्स ज्या सेवा पुरवतात त्यांचा वापर केला पाहिजे.मोबाईल विकत घेतला चेक द्या,भाड्याच्या घरात राहतोय तर भाडं NEFT ने डायरेक्ट घरमालकाच्या अकाउंट मध्ये भरा.अश्या अनेक गोष्टींसाठी शक्य तिथे याचा वापर केला पाहिजे. • नेट  बँकिंग /मोबाईल बँकिंग- आता सर्वच बॅंक्स या दोन सेवा पुरवतात.या सेवांचा फायदा घेऊन घर बसल्या किंवा असू तिथून बँकेतही न जाता पैसे ट्रान्सफर करू शकतो.या सेवांमुळे आपण बॅंक्स मध्ये न जाताही त्याची सर्व काम करू शकतो आणि वेळही फार लागत नाही कारण लाईन नाही.याद्वारे आपण निरनिराळी बिल्स हि भरू शकतो.UPI (Unified Payment Interface) ह्या NPCI(National Payments Corporation of India) ने डेव्हलप केलेल्या app मध्ये अनेक बॅंक्स ची  नेट बँकिंग व्यवस्था एक केली आहे.तसेच याच NPCI ने *९९# ही सुविधा आणली आहे,जिच्या साहाय्याने इंटरनेट सुविधा नसतानाही तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंट शी जोडलेला असेल तर नेट बँकिंग ने जी काम होतात ती सर्व आपण करू शकतो.SMS सुविधेचे चार्जेस फक्त लागतात.                                                                                                                             • क्रेडिट/डेबिट कार्ड  पेमेंट -  क्रेडिट-डेबिट कार्ड स्वीप करून पण डायरेक्ट खरेदी करू शकतो तसेच ऑनलाईन पेमेंट्स हि करू शकतो.बहुतांश दुकाने,हॉटेल्स कार्ड पेमेंट स्विकारतात आणि आता कॅशलेस इकॉनॉमी ला चालना देण्यासाठी केंद्र सरकार ने कार्ड पेमेंट्स वर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत तसाच सध्या तरी या transactions वरचा टॅक्स कमी केला आहे. http://finmin.nic.in/press_room/2016/Pkg_promotion_digitalCashless.pdf


              दुकानात स्वीप करून कार्ड पेमेंट करायची प्रक्रिया एकदम सोपी आहे,फक्त आपण atm वापरताना जो PIN टाकतो तोच टाकायचा की लगेच पेमेंट होता.ऑनलाईन पेमेंट करताना कार्ड चा १६ आकडी नंबर,कार्ड एक्सपायरी डेट,CVV नंबर असा सगळं दिलेल्या रकान्यांमध्ये भरलायला लागतं आणि आपल्या Register Mobile Number वर आलेला One Time Password(OTP) टाकायला लागतो की पेमेंट होतं.
 या कार्ड्स-नेट बँकिंग चा वापर करून आपण अनेक काम करू शकतो.उदा.-लाईट बिल्स,फोन बिल्स अशी बिल्स भरण;बस-रेल्वे-विमान यांची रिझर्व्हशन्स करणं,Movie Tickets काढणं,ऑनलाईन शॉपिंग इत्यादी अनेक व्यवहार घर बसल्या कमीत कमी वेळेत होतात. 

 • मोबाईल वॉलेट्स- सध्या अनेक वेगवेगळ्या कंपनी आणि काही बॅंक्स मोबाईल वॉलेट सुविधा पुरवतात. ह्या मध्ये App वापरून  डेबिट कार्ड-नेट बँकिंग सुविधा वापरून बँक अकाउंट मधले पैसे या मोबाईल वॉलेट मध्ये घ्यायचे आणि या app चा वापर करून पेमेंट्स करायची.या मध्ये फक्त एकच उणीव म्हणता येईल ती म्हणजे पैसे देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांकडेही एकच मोबाईल वॉलेट अँप हवं.मोबाईल वॉलेट मध्ये जमा असलेले पैसे आपण परत बँक अकाउंट मध्ये जॅमही करू शकतो.कार्ड्स ने करता येणारी सर्व काम आपण या मोबाईल वॉलेट मधनं पण करू शकतो,App  वरच वेगवेगळ्या पेमेंट्स चा option येतो.प्रत्येकवेळी वेगवेगळ्या वेबसाईट वर जायची गरज नाही.


 • लेसकॅश  इकॉनॉमी चे फायदे-   
 1. अधिकाधिक व्यवहार हे बँकद्वारे झाल्याने पारदर्शकता येईल.काळा पैसे तयार व्हायच्या प्रक्रियेला काही प्रमाणात तरी आळा बसेल. 
 2. वापरायला सोपे तसेच जलद त्यामुळे वेळेची बचत होईल. 
 3. सगळी Transactions  रेकॉर्ड वर आल्याने हिशोब ठेवायलाही सोपा जाईल.खर्च व्यवस्थित दाखवू शकतो. 
 4. कार्ड-फोन चोरीला गेला तरी कार्ड-अकाउंट ब्लॉक करून आपण त्यांचा गैरवापर थांबवू शकतो. 
 5. काही दुकानदार आणि सध्या केंद्र सरकार पण अश्या पेमेंट्स ना उत्तेजना देण्यासाठी डिस्काउंट देत आहेत. 
 6.  गुन्हेगारीला आळा बसेल. 
            भारत कॅशलेस होणं कसं कठीण आहे,कसा होणारच नाही,अशी चर्चा न करत बसता कसा होईल या साठी कृती केली पाहिजे.महात्मा गांधीजी जसं म्हणाले आहेत-"Be The Change That You Want To See In The World" त्या प्रमाणे आपण स्वतः प्रथम लेसकॅश व्हायला हवं आणि किमान ४-५ जणांना तरी या लेसकॅश इकॉनॉमी च्या गंगेत सामावून घ्यायाला मदत करायला हवी.
                                                                                                  -श्रवण दांडेकर 😃  

Tuesday, 6 December 2016

3D सफर!!😁😁😊 (भाग-2)


       हॉटेलमालकाला अंबाजोगाई रस्ता विचारला तर म्हटला २०० km आहे आणि 
अंबाजोगाई ला कशाला चाललाय??आम्ही सांगितलं देवी आहे ना तिथे,दर्शनाला.’अंबाजोगाई 
ला कुठ्ये देवी??येरमाळ्यात आहे.तिथे जा.”तिथेच त्यांना नमस्कार केला आणि गुगल गुरूंना 
शिरसावंद्य मानून त्यांनी सांगितलेल्या ९९ km रस्ता कापायला लागलो.सकाळी सकाळी 
सरळ सरळसोट रस्त्यावर मी गाडी चालवत होतो.आणि दोन माणसं फारच टेन्शन 
मध्ये!!बाबांचं “सेकंड टाक”आणि आईच “श्रवण सावकाश” याला कंटाळून आणि जठराग्नीला 
स्मरून नाश्त्याला गाडी थांबवली.भजे आणि पुरी भाजी हे दोनच मेनू.दोन्ही मागवले.गोळा 
भजी आणि वाटणा उसळ आणि पुरी combination भन्नाट लागत होत.खाऊन झालं आणि 
बाहेर रस्त्यावर थांबली.या संपूर्ण ट्रीप मध्ये सगळ्यात constant काय असेल तर तो आईचा 
खोकला.रस्त्यावर गाडी जवळ जाऊन थांबलेल्या आई ला खोकल्याची जोरदार उबळ आली 
आणि ती बघून आणि ऐकून एका ट्रकवाल्याने आईला इतका खोकला झालाय तर खाऊ नका 
इथे २-३ दिवस तेच तेल असता वगैरे सल्ला दिला.खाऊन तर झालं होत.सोडा आता!!असा 
म्हणून अंबाजोगाई ला पोचलो.
 


      अंबाजोगाई ला देवीचं दर्शन घेतलं.जवळपास काय बघण्यासारख आहे बघितलं.जवळच 
मराठी भाषेतले आद्य कवी मुकुंदराज महाराजांची समाधी आहे.अतिशय निसर्गरम्य 
ठिकाण.दोन्ही बाजूंना डोंगर.मध्ये दरी.दरीतून नदी वाहत्ये.डोंगर उतारावर समाधी.बाकी 
डोंगरावर तसं जंगल होतं.पक्षी अभयारण्याचे बोर्ड दिसत होते.समाधी वगैरे बघून आम्ही 
अंबाजोगाई हून निघालो.केज,मांजरसुंभा,बीड अश्या अतिशय सरळ,अजिबात वळण 
नसलेल्या कंटाळवाण्या रस्त्यावरून शहागड पर्यंत पोचलो.सरळ म्हणजे किती सरळ असावा 
रस्ता!!आता वळण येईल,आता वळण येईल पण नाहीच!!सरळ रस्ता,मग परत सरळ रस्ता 
आणि म परत सरळच रस्ता!!आमच्या गाडीला कायम तोंडली,भोंबडी(हि गावं आहेत.)आणि 
आंजर्ले रस्ता कापायची सवय.या रस्त्यांवरती सरळ रस्ता सापडणं जेवढं कठीण त्याहून या 
अंबाजोगाई-पैठण रस्त्यावर वळण येणा कठीण.शहगाडला चहा प्यायलो आणि डावीकडे 
वळून पैठण च्या दिशेने निघालो


.रस्त्यातली शेती बदलायला लागली होती.बार्शी-
अंबाजोगाई-शहागड रस्त्यावर कापूस,तूर जास्त दिसत होते.आता हा शहागड-पैठण रस्ता 
गोदावरीच्या किनाऱ्याने असल्याने आता परत ऊस दिसायला लागला होता.कापूस 
होताच.रस्ता मात्र प्रचंड खराब.वाटेत जाताना संत ज्ञानेश्वरांच आपेगाव लागलं.७ च्या 
सुमारास पैठण ला पोचलो तर ट्राफिक जाम झालं होत.ऊसवाहू ट्रक सगळे एका बाजूला 
थांबवत होते.पैठण जवळ पोचलो.गुगल गुरूंच्या म्हणण्यानुसार ज्ञानेश्वर गार्डन जवळ 
राहायला हॉटेल होती.म तिथे असलेल्या एका पोलीस काकांना ज्ञानेश्वर गार्डन ला कसा 
जायचं विचारलं.त्याने सांगितलं आणि आता काय काम तुमचं तिकडे विचारून बॉम्ब टाकला 
आमच्यावर.राहायला हॉटेल मिळेल म्हणाले आणि पुढच्या कामाला ते लागले.आम्ही मात्र 
त्यांनी असं का विचारलं याच कोड्यात.गार्डन जवळ गेलो तिथे हॉटेल्स होती पण त्यांची 
lodge गावात st stand जवळ.तिथे गेलो समान वगैरे ठेवलं आणि गार्डन ला गेलो.गार्डन ला 
गेल्या वर ते पोलीस काका असा का म्हणाले लगेच कळला.तिकीट countar वरच्या 
माणसाच्या म्हणण्या नुसार गार्डन मधला musical fountain show २ महिने झाले 
technical problem मुळे बंद होता.गार्डन बघायला उद्या सकाळी या असं आम्हाला 
सांगण्यात आलं.त्यानंतर मग आम्ही एकनाथ महाराजांच्या समाधिस्थळाकडे 
गेलो.मा.पंतप्रधान ओरडून ओरडून सांगत असलेल्या स्वच्छ भारत मिशन च स्वच्छतेचं काय 
एकही कदम या सातवाहानांच्या प्रतिष्ठान पर्यंत पोचलेलं दिसत न्हवतं.सगळीकडे कचरा,बकालपणा!!सगळी कडून डुक्कर पळतायत.जेवढी घाण तेवढी डुक्कर सुदृढ या direct 
relationship मध्ये एकही कुपोषित डुक्कर दिसत न्हवत.माजलेली नुसती!!एवढं 
प्राचीन,भरभ

राट असलेलं हे शहर,अस्वच्छतेमुळे सगळी रया गेल्या सारखं वाटत. 
         सकाळी सकाळी नाथ वाड्यात गेलो.सगळीकडे देऊळा खूप,माणसं देखील सकाळी 
सकाळी देवळात जात होती.पण त्या अस्वच्छतेच काय??एकूणच पण आपल्याकडे अशी श्री 
क्षेत्र असलेल्या ठिकाणी देऊळा चकाचक पण गाव मात्र बकालपणात स्पर्धा करताना 
दिसतात!!मग ज्ञानेश्वरांनी जिथून रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या घाटावर गेलो.जवळच शालिवाहन राजाने अश्वमेधानंतर तिथे विजय स्तंभ बांधला आहे.साधारण १५ फूट 
असलेल्या या विजयस्तंभावर अतिशय सुंदर,अलौकिक कोरीव काम आहे.आणि नेहमी प्रमाणे 
फक्त भारतीय पुरातत्वखात्याचा एक बोर्ड!!!बाकी संपूर्ण दुर्लक्ष.कोण्या एका काळी त्याच्या 
सुशोभिकरणाचा प्रयत्न झालेल्याचे पुरावे दिसतात.बाकी मेंटेनन्स ‘००’.सातवाहनांनी 
बांधलेला खांब मात्र तसाच उभा आहे.त्यानंतर आम्ही गेलो जायकवाडी धरणावर.वरती 
फिरून आलो.आली एका ठिकाणी मिसळ खाल्ली.छोटंसं हॉटेल अगदी.हॉटेल म्हणजे 
काय,open च.बाकडी टाकलेली नुसती.मेनू मध्ये होते मिसळ आणि पोहे.मिसळ म्हणजे 
माझ्या जीवाभावाचा पदार्थ.मिसळ घेतली.आहा!!काय मिसळ!!सगळ्या ट्रीप मध्ये जर कोणत्या पदार्थाने जीभ आणि मन जिंकून घेतलं ति म्हणजे ही मिसळ.      मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही ज्ञानेश्वर उद्यानात गेलो.पूर्वावैभवाच्या खुणाच फक्त 
दिसत होत्या.Fountain show बंद होता ठीके.पण उद्यान म्हटल्यावर किमान चांगलं 
हिरवागार lawn,सुंदर फुलझाडांचे ताटवे असं तरी सुस्थितीत असायला हवं होतं ना 
किमान.नुसता रखरखाट वाटत होता.काही तुरळक फुलझाडांना तिथली माणसं 
झारीने,बादली ने पाणी घालत होती.Amusement Park म्हणून जो काही प्रकार होता तो 
कोणत्यातरी इसवी सनात इथे होता असं सांगण्यापुरताच वाटत 
होता.निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई भिंती वर बसलेला पुतळा,त्याला खाली चाकं आणि 
रूळ.यावरून हा भिंत चालवण्याचा प्रयोग आधी होत असणार असा आमचा अंदाज.या संतांचे 
कपडे ऊनपावसाने विटलेले,फाटलेले.हैदराबाद मधला NTR गार्डन असो वा म्हैसूरच वृंदावन 
गार्डन इथे कधी अशी परिस्थिती बघितल्ये??बांधलेलं आहे त्याचा mentenance पण 
आपल्याला धड जमू नये??राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारं हे उद्यान ह्याची ही 
परिस्थिती व्हावी!!हे उद्यान हे पैठण मधील मोठं आकर्षण होत.प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरास 
झाला.
         पैठण म्हटल्यावर पहिल्यांदा डोक्यात येणारा नाव म्हणजे पैठणी.पैठण मध्ये मऱ्हाटी 
पैठणी कला केंद्र आहे तिथे गेलो.तिथे order नुसार पैठण्या हातमागावर तयार केल्या 
जातात.आम्ही गेलो तेव्हा विणकर वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या विणत होते.पैठन्यांची सुरात 
२५००० पासनं.त्यात बारीक design आलं,जर आली कि किमती वाढल्या.फारच 
कलाकुसरीच काम.त्या केंद्रातच प्रशिक्षण केंद्र.त्यात शिकलेल्यांना इथे काम.साडीच्या 
किमतीच्या प्रमाणात यांचा मोबदला.२ महिने लागतात साधारण एक पैठणी विणायला.
  हे केंद्र बघून झाल्यावर आईने त्यावर लिहिलेला छोटासा लेख.
        “सिद्धटेक,अंबाजोगाई करून पैठण ला आलो.बरच ऐकला होतं पैठण विषयी आणि 
अर्थातच पैठणी विषयीही.खानदानी पैठणी काय असते ते पैठणलाच कळतहातमाग,अस्सल 
रेशीम आणि थक्क होऊ अशी कलाकुसर.निर्मितीतला आनंद आपल्याला असतोच पण पैठणी 
निर्मितीची प्रोसेस पाहून वाटला ते आनंदाहून निराला होतं.अचंबा,आश्चर्य आणि त्याहून 
अतिशय सर्वसामान्य हातून घडत असलेलं हे १००% देशी काम पाहून भारावून गेली मी.
        महाराष्ट्र शासनाचे मऱ्हाटी पैठणी कला केंद्र.४०/५० हातमाग असतील.प्रत्येक 
हातमागावर जॉबकार्ड अडकवलेलं.वस्त्र विणायला घातल्याची तारीख,रंग,दर्जा,विणकर 
स्त्री/पुरुषाचं नाव.contract basis काम चालू.वस्त्रावरील कामावर विणकराचा मोबदला 
अवलंबून.
        आम्ही ११ च्या दरम्यान गेलो होतो.एक एक करून ७/८ बायका आल्या.कुणाच्या 
हातात तान्हा बाळ तर कुणाच्या बोटाला धरून खेळकर लेकरू.हातमागाला चादर बांधून 
केलेल्या पाळण्यात तान्हुल्याला ठेवून तिचे सराईत हात सरसर चालू सुद्धा झाले.छोटुला 
आल्यावर लगेच खेळाबागाडायला सुरवात.या मुलाबाळासहित विणकर स्त्रीयांना येण्याची 
परवानगी बघून मला काय वाटलं ते शब्दात नाही मांडू शकत मी.  
        पैठणीवरचा हसरा मोर आई आम्हाला पाहून आईच्या पदराला पकडून ठेवणारा हा 
लाजरा मोर सारखेच वैभवशाली वाटत होते.मुलाबाळांचा विचार केला जातो ते स्थान 
देवस्थान माझ्यासाठी.आपल्याला अशी पैठणी घ्यायला कधी जमेल का??एवढा तोकडा 
विचार शिवलाच नाही मला तिथे.कसंबाई हे करतात एवढं नाजूक साजूक......कायभारी हे 
रेशीम....त्याचे रंग......आणि कसा ना चकचकीत डोळ्यांचा हा मुलगा.....कसा ना तिने 
पटक्कन पाळणा केला लेकरास!!”
     
       या नंतर म आम्ही शेवगाव मार्गे नगर आणि नगर रोड ने पुणे गाठलं.२० तारखेला माझं 
parcel पुण्यात टाकून आईबाबा परत घरी.त्याच त्याच routin मधनं जरा change 
झाला.आता परत आई बाबा hipres-२५,त्रिफळा चूर्ण असल्या routin मध्ये.माझं कॉलेज 
क्लास परत सुरु.परत असे कधी जाऊ  काय माहित आता.route मात्र ठरवून मोकळे.चलो 
कोस्टल कर्नाटका!!!
                                          
     

                                  ~श्रवण दांडेकर!!😊😊

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध ...