Skip to main content

Posts

Showing posts from 2016

Be Lesscash!!

                                                 D emonetisation   झालं आणि भारतात कॅशलेस इकॉनॉमी चे वारे वाहायला सुरवात झाली.पंतप्रधानांनी देखील कॅशलेस व्हायचे नारे दिले.पण कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे नक्की काय ?? नक्की करायच काय ?? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं-शंकानिरसन करण्यासाठी हा लेख.        कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय ?? भारतात शक्य आहे का ??             कॅशलेस इकॉनॉमी अशी इकॉनॉमी ज्यात जास्तीतजास्त व्यवहार हे कार्ड वा डिजिटल मेडीयम होतात.थोडक्यात काय तर कुठेही डायरेक्ट कॅश मध्ये पैसे द्यायचे नाहीत.कॅश कमीतकमी वापरायची.पुढचा प्रश्न महत्वाचा ठरतो की हे भारतात शक्य आहे का ?? तर हो.नक्कीच होऊ शकत.प्रत्येक गोष्टीच्या सुरवातीच्या काळात गोष्टी अवघड , अशक्य वाटतात पण नंतर सवय होते आणि होऊन जातं.तसच हे हि होईल.आणि कोणतीही मोठी गोष्ट करताना २ गोष्टी फार महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि जनसहभाग.या दोन्हीच्या सहकार्याने भारत नजीकच्या भविष्यकाळातच एक यशस्वी लेसकॅश इकॉनॉमी तर नक्कीच होऊ शकतो.   कॅशलेस व्हायचा कसं ??             साधारणपणे मनात येणारा   प्रश्न.त

3D सफर!!😁😁😊 (भाग-2)

       हॉटेलमालकाला अंबाजोगाई रस्ता विचारला तर म्हटला २०० km आहे आणि  अंबाजोगाई ला कशाला चाललाय??आम्ही सांगितलं देवी आहे ना तिथे,दर्शनाला.’अंबाजोगाई  ला कुठ्ये देवी??येरमाळ्यात आहे.तिथे जा.”तिथेच त्यांना नमस्कार केला आणि गुगल गुरूंना  शिरसावंद्य मानून त्यांनी सांगितलेल्या ९९ km रस्ता कापायला लागलो.सकाळी सकाळी  सरळ सरळसोट रस्त्यावर मी गाडी चालवत होतो.आणि दोन माणसं फारच टेन्शन  मध्ये!!बाबांचं “सेकंड टाक”आणि आईच “श्रवण सावकाश” याला कंटाळून आणि जठराग्नीला  स्मरून नाश्त्याला गाडी थांबवली.भजे आणि पुरी भाजी हे दोनच मेनू.दोन्ही मागवले.गोळा  भजी आणि वाटणा उसळ आणि पुरी combination भन्नाट लागत होत.खाऊन झालं आणि  बाहेर रस्त्यावर थांबली.या संपूर्ण ट्रीप मध्ये सगळ्यात constant काय असेल तर तो आईचा  खोकला.रस्त्यावर गाडी जवळ जाऊन थांबलेल्या आई ला खोकल्याची जोरदार उबळ आली  आणि ती बघून आणि ऐकून एका ट्रकवाल्याने आईला इतका खोकला झालाय तर खाऊ नका  इथे २-३ दिवस तेच तेल असता वगैरे सल्ला दिला.खाऊन तर झालं होत.सोडा आता!!असा  म्हणून अंबाजोगाई ला पोचलो.         अंबाजोगाई ला देवीचं

3D सफर!!😁😊😊(भाग-1)

         बऱ्याच वर्षांनंतर या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायच ते स्वतःची गाडी घेऊन आणि बाकी कोणाच्या पायात अडकून न राहता तिघांनीच असा ठरला.ठरल म्हणजे नुसता जायचं ठरलं रूट तारखा काहीच न्हवत.मग सुरु झालं मिशन Rout Fixing!! मग मी,आई,बाबा यांचा तिघांचाची वेगवेगळा अभ्यास सुरु झाला.मधेच असं ठरलं की ट्रीपचा शेवट पुण्यात करायचा म्हणजे माझं पार्सल तिथे उतरवता येईल.कॉलेज २१ पासून सुरु होणार होता म्हणून म तारखा ठरल्या १७,१८,१९,२० नोव्हेंबर.कुठे जायचं याचा अजून काही पत्ता न्हवता.पुण्यात शेवट करायचा ठरल्यावर कोस्टल कर्नाटक आणि बदामी-हंपी हे पर्याय आले तसेच लगेच परत गेले.शेवटी रूट ठरला.आणि असा ठरलं कि हा फक्त रूट तसाच ठेवायचा,पण कुठे राहायचं,कुठे थांबायचं हे ‘मनाचा ब्रेक,उत्तमब्रेक’या तत्वावर ठरवायचं.          १७ ला सकाळी ६ ला सूर्यदेव पूर्वेकडून पश्चिमेकडे यायला निघाले आणि आम्ही जरासे पूर्वेकडे निघालो.कादिवलीतून आवाशीमार्गे लाटवणहून डायरेक्ट वरंध घाटाच्या रस्त्याला लागलो.वरंधा घाटातून जायचं म्हटल्यावर नाश्ता कुठे करायचा हा प्रश्नच नाही.८ साडे ८ वाजता मस्तपैकी गरम गरम भजी,चहा झाली

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ