Tuesday, 8 November 2016

गुण गाईन आवडी!!🙏
दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं.
आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन.
मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!!
मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅)
पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!!
बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!!
हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच.
पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅड शाॅ च इंग्लिश नाटक-पिग्मॅलिअन जे पुलंनी मराठीत आणलं-'ती फुलराणी'.
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.तसच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
बहुपैलू व्यक्तीमत्व म्हणजे काय हे पुलं कडे बघून कळतं.साहित्य,कला क्षेत्रातील प्रत्येक प्रकाराला या पुरूषोत्तमाने सुवर्णस्पर्श केला.
'अनंत हस्ते पुरूषोत्तमाने देता,किती घेशील दों कराने' हाच प्रश्न स्वतःला पडतो.
अशा या थोर मानवाच्या जन्मदिनी मी हा ब्लाॅग सुरू करतोय(करण्याच धाडस करतोय).यांच्या आशीर्वादाने माझ्या या प्रयत्नांना यश मिळावे आणि मेंदू विचारता आणि हात लिहता रहावा ही प्रार्थना!!
😊😊
ज्याने वाचनाची आवड वेडात परिवर्तीत केली अशा पुरूषोत्तमाला मनःपूर्वक प्रणाम!!
      ~श्रवण दांडेकर😊


18 comments:

 1. छान! उत्तमोत्तम लेख लिहीत जा.
  पुलंच्या जन्मदिनाचा मुहुर्त चांगला साधलास...

  ReplyDelete
 2. झकास!🤗🤗😉😉😊

  ReplyDelete
 3. सुदंर सुरुवात श्रवण��������

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. Chan lihile ahes..asach ligit raha...grt effort..all the best...

  ReplyDelete
 6. खुपच छान प्रयत्न

  ReplyDelete
 7. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 9. झकास, जोरात सुरु ठेव ब्लॉग..

  ReplyDelete

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध ...