Skip to main content

गुण गाईन आवडी!!🙏




दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं.
आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन.
मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!!
मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅)
पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!!
बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!!
हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच.
पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅड शाॅ च इंग्लिश नाटक-पिग्मॅलिअन जे पुलंनी मराठीत आणलं-'ती फुलराणी'.
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.तसच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
बहुपैलू व्यक्तीमत्व म्हणजे काय हे पुलं कडे बघून कळतं.साहित्य,कला क्षेत्रातील प्रत्येक प्रकाराला या पुरूषोत्तमाने सुवर्णस्पर्श केला.
'अनंत हस्ते पुरूषोत्तमाने देता,किती घेशील दों कराने' हाच प्रश्न स्वतःला पडतो.
अशा या थोर मानवाच्या जन्मदिनी मी हा ब्लाॅग सुरू करतोय(करण्याच धाडस करतोय).यांच्या आशीर्वादाने माझ्या या प्रयत्नांना यश मिळावे आणि मेंदू विचारता आणि हात लिहता रहावा ही प्रार्थना!!
😊😊
ज्याने वाचनाची आवड वेडात परिवर्तीत केली अशा पुरूषोत्तमाला मनःपूर्वक प्रणाम!!
      ~श्रवण दांडेकर😊






Comments

  1. छान! उत्तमोत्तम लेख लिहीत जा.
    पुलंच्या जन्मदिनाचा मुहुर्त चांगला साधलास...

    ReplyDelete
  2. झकास!🤗🤗😉😉😊

    ReplyDelete
  3. सुदंर सुरुवात श्रवण��������

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Chan lihile ahes..asach ligit raha...grt effort..all the best...

    ReplyDelete
  6. खुपच छान प्रयत्न

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. झकास, जोरात सुरु ठेव ब्लॉग..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग