Monday, 21 November 2016

'नोट'कारण!!


८ नोव्हेंबर!!रात्रीचे ८ वाजलेले.अचानक मोबाईल खणखणू लागला.whatsapp वर messages चा अक्षरशः पाऊस पडत होता.सगळीकडे एकच विषय चालू होता तो म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला ‘demonetisation’चा निर्णय! अर्थात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा!!
ह्या अचानक निर्णयामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.मोदींनी त्यांच्या भाषणात आज रात्री पासून नोटांचं लेगल टेंडर रद्द असा जाहीर केलं आणि आपल्या कडच्या ५००/१००० च्या नोटा ३० dec. पर्यन्त बँकेत deposit करून रोज २००० रु. काढण्याची मर्यादा ठेऊन गरजेनुसार काढा असं सांगितलं.याच भाषणात पंतप्रधानांनी हा निर्णय हा प्रामुख्याने काळा पैश्यावर कारवाई करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणत असलेल्या खोट्या नोटांना आळा घालण्यासाठी आणि पर्यायाने या वर जगणाऱ्या अतिरेकी संघटनांना आळा घालण्यासाठी घेत असल्याचं सांगितलं.
या निर्णयानंतर भक्त सगळा काळ्या पैश्याचा प्रोब्लेम सुटला असे गाणी गातायत तर भुक्त लोक्स “याने काय होणारे,नुसते स्टंट,हाच एक घोटाळा आहे !” असे भुंकतायत.
या निर्णयामुळे सगळाच काळा पैसा काही नाहीसा होणार अथवा समोर येणार नाही परंतु काहीच होणार नाही असा हि नाही.जर याने काहीच झाला नसतं तर माणसांनी गंगेत १००० च्या नोटा फेकल्या नसत्या.पण भारतात सरकारने एखादा निर्णय घेतला आणि त्या योग्य निर्णयाला विरोधाकांनी पाठींबा दिला असं कसं होईल??(खासदारांची वेतनवाढ सोडा!!)प्रत्येक गोष्टीवर राजकारण हे झालाच पाहिजे ना.राजकारण सुरु झालच आणि सुरु झालं ते चर्चांचे थैमान,सामान्यांच्या मनात शंकांचे गोंधळ,बँक बाहेरच्या रांगा,सर्वच राजकारण्यांना आलेला सामन्यांचा पुळका आणि media वाल्यांचे रांगेत घुसून रांगेत कशी गर्दी आहे दाखवत TRP मिळवण्याचा धंदा.
या निर्णयावर अनेक प्रश्न विचारले गेले त्यांची मला माझ्या बुद्धीने सुचलेली उत्तरे.
1.    निर्णय हा political आहे.UP elections डोळ्यासमोर ठेऊन घेतला आहे.
--भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणुका या कुठेनाकुठेतरी चालूच असतात.आज घेतला म्हणून UP साठी आधी घेतला असता तर प.बंगाल साठी म्हणता आला असता किंवा नंतर घेतला असता तर गुजरात,गोवा म्हणता येईल.
--जिथे वर्षानुवर्षे ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथे नवीन रेल्वे जाहीर करण्याची प्रथाच जिथे पडली होती तिथे एकदम एवढा मोठा  निर्णय politics बाजूला ठेऊन होईलच कसा? काही प्रमाणात political agenda हा असणारच,अजिबात नाही असं ही समजण्याच काही कारण नाही.
2.      Black Money वाले रांगेत दिसत नाहीत,सामान्य माणसांना त्रास फक्त.
--बेसिक म्हणजे ज्यांच्याकडे black money आहे ते रांगेत उभे राहतीलच कशाला??कारण रक्कम हि बँकेत भरायची असल्याने त्या वर IT department ची नजर असणार.income tax च्या वेबसाईट वर ‘account cash transactions’अशी नवीन window आल्ये.ज्यात आपण बँकेत भरलेली रक्कम थेट इथे दिसते.त्यामुळे इथे रक्कम भरण हे त्यांच्यासाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा आहे.त्यामुळे ही माणसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडचा काळा पैसा पांढरा करण्याचे मार्ग शोधत आहेत.
--सामान्य माणसांना त्रास होत असला तरी बहुसंख्य ‘खरी’ सामान्य माणसं ही निर्णय हा योग्यच आहे,त्यासाठी जरावेळ थांबू या मताचे आहेत.
(मी कादिवलीतील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत स्लीप्स भरण्यात मदत केली,तेव्हा तिथे महिन्यातून एकदा रेशनसाठी थांबायला लागतं तसं आता थांबू अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या.)
--आणि जे या निर्णयाला विरोध करणारे आहेत त्यातले बहुसंख्य हे मोदीद्वेश या एकच कारणाने अनेक मुद्दे शोधून शोधून विरोध करत आहेत.
3.      या निर्णयामुळे माणसं मेली त्याचं काय??
 (झालेले मृत्यू हे दुर्दैवीच,पण त्याने अख्खा निर्णय १००० च्या नोटेसारखा ठरत नाही!!)
--पहिला मुद्दा म्हणजे काही हॉस्पिटल मध्ये ५०० १००० च्या नोटा न स्वीकारल्यामुळे मृत्यू झाले.या मुद्द्यात हॉस्पिटलमध्ये ५०० १००० च्या नोटा या स्वीकारण्यात येतील असा सांगून सुद्धा घेतल्या नाहीत तेव्हा त्यात हॉस्पिटलचा हलगर्जीपणा,हातझटकूपणा दिसतो.अनेक हॉस्पिटल मध्ये असा काही निर्णय नसताना सुद्धा पैसे भरल्याशिवाय admit करून घेण्यात नकार दिल्याने मृत्यू झालेले आहेत हे विसरता कामा नये.

4.      या निर्णयाचे फायदे काय?
या निर्णयामुळे short टर्म फायदे तरी बरेच दिसतात.long term मध्ये काय काय होईल याचे काही अंदाजच फक्त आपण बांधू शकतो.
·         Cash स्वरुपात असणारा काळा पैसा economy मध्ये येईल.भलेही याचा प्रमाण कमी असेल पण काही प्रमाणात तरी असा पैसा येईलच.
·         नकली नोटांवर प्रतिबंध येईल.त्यातून होणाऱ्या काळ्या धंद्यांना आला बसेल.
·         अतिरेकी संघटना,नक्षलवादी यांच आर्थिक कंबरडे मोडेल.त्यातून त्यांच्या घातकी कृत्यांना पायबंद बसेल.(काश्मीरमध्ये बुर्हान वनी ला मारल्यानंतर सुरु झालेली अस्वस्थता या निर्णय नंतर अचानक नाहीशी झालेली दिसते.काश्मीरमध्ये एकही दगडफेकीची घटना नाही!!)
·         ग्रामपंचायती,नगरपालिका,महानगरपालिका यांची विक्रमी करवसुली.(पुणे महानगरपालिकेमधेच ९३.७५ कोटी रुपयांचा कर गोळा झाला आहे.)
·         सगळे पैसे हे बँकेत जमा करायचे असल्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात पैसे येतील,NPAs मुळे जो बँकिंग सेक्टर ला तोटा होत आहे त्यातून बँकिंग सेक्टर सावरेल.तसचं NPAs ची संख्याही बरीच कमी होईल.तसंच बँकेमध्ये पैसे जमा झाल्याने व्याजदरात देखील कपात होईल.
·         कॅशलेस इकोनोमीच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे जाऊ.कार्ड पेमेंट,चेक पेमेंट,NEFT,RTGS,मोबाईल बँकिंग,नेट बँकिंग यांच्या जास्त वापरला सुरवात होईल.हे सर्व व्यवहार बँकेद्वारा होणारे असल्याने त्यात पारदर्शीपणा येईल.
·         हे असं demonetisation ठरावीक कालावधीनंतर करत राहिल्यास काळा पैसा कॅश रुपात तरी कोणीही साठवणार नाही.


·         या निर्णयामुळे साधारणपणे १,४०,४०० कोटी रु. इतका फायदा होऊ शकतो असा अर्थाशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
5.      या निर्णयाचे तोटे काय??त्यात तथ्य काय?
अचानक आलेल्या या निर्णयामुळे सामान्य माणसाला त्रास होतच आहे.माणसं रांगेत खोळंबली आहेत.पण हे तोटे काही long term असणार नाहीत.आणि तोटे तोटे ओरडणारे हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी ओरडत आहेत.
·         निर्णयाचा मुख्य फटका हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बसत होता.आलेला माल तसाच पडून फुकट जात होता.परंतु आता परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे.
·         रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्ग,भाजीवाले,किरकोळ विक्रेते यांना नुकसान होत आहे पण हे देखील लवकरच सुरळीत होईल.
·         सहकारी बँकांमध्ये व्यवहाराला RBI ने बंदी केल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल,सहकारी बँक्स बुडतील.यात महत्वाच म्हणजे मुळात बंदी का करावी लागली?या सहकारी बँक्स चे चेअरमन हे कोणनाकोणतरी राजकारणी असतात.त्यांनी या बँक्स चा वापर करू नये हा त्यातला हेतू होता.दुसरा म्हणजे मुळात बुडालेल्याला अजून काय बुडवणार?आणि आता बहुतांश शेतकऱ्यांची accounts हि commercial अथवा regional बँक्स मध्ये आहेत.
·         ३० डिसेंबर नंतर जर बँकेत जमा झालेला पैसा पुरेश्या प्रमाणात economy मध्ये आला नाही तर मंदीचा धोका उद्भवतो.पण हे जर तर वरच अवलंबून आहे.त्यामुळे या निर्णयाकडे बघताना थेट तोटे हे मोठ्या रुपात काही दिसत नाहीत.
·         या निर्णयांच्या implimentation च्या कालावधीत सर्व सुरळीत होई पर्यंत साधारणतः २४००० कोटी रु. इतका तोटा होऊ शकतो.


     ह्या निर्णयामुळे सर्वच काळा पैसा संपेल असं नाही,असा दावाही मोदींनी केलेला नाही.पण भारताला पोखरणाऱ्या या भ्रष्टाचार,काळा पैसा,आतंकवाद ह्यांना कमी करण्यात मात्र हा निर्णय महत्वाचा आहे.कोणीतीही गोष्ट अचानक होत नसते,त्यात काही पायऱ्या असतात.हा निर्णयही अशीच एक पायरी आहे देशविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी.मुळात म्हणजे आणि वर्षानुवर्ष आहे तसाच चालू आहे,कोण काही बघत नाही,करत नाही,तुम्ही हवे तेवढे पैसे साठवा ही जी मनोवृत्ती निर्माण होत होती त्याला याने पायबंद बसेल.विरोधकांनी देखील नुसती रांगांबद्दल तक्रार करत न बसता प्रक्रीयेमध्ये वेग कसा येईल यासाठी मदत केली असती तर आता पर्यंत सगळा सुरळीत झालं असत.मात्र ते होणा अशक्यच उलट विरोधक बँकांमध्ये नागरिकांचे पैसे सुरक्षित नाहीत,बँक्स पळून जातील किंवा मोदिजी सामान्य माणसांचा पैसा उद्योजकांमध्ये वाटतील अशी करत आहेत.
काळे पैसे साठवणारे जे जे भेटतील त्यांना नुसता २००% tax,६ महिने का

रावास ह्या शिक्षा न करता,हा पैसा त्यांनी कोणत्या मार्गातून मिळवला ह्याचा शोध घेऊन त्याची पाळमुळ शोधून उखडून काढली पाहिजेत.system मध्ये जी loop holes आहेत ज्यामुळे हा काळा पैसा प्रकरण निर्माण झालेलं आहे तीच बुजवली पाहिजेत.तरच कायमस्वरूपी हे प्रकरण संपुष्टात येईल.आणि देशासाठी असा कार्य करणऱ्याला कायमच सामान्य जनतेचा पाठींबा राहील.
                                   -श्रवण दांडेकर.
Ø   
Ø   


 


2 comments:

  1. श्रवण खुपच छान विचार मांडले आहेस

    ReplyDelete

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध ...