Friday, 2 December 2016

3D सफर!!😁😊😊(भाग-1)

         बऱ्याच वर्षांनंतर या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायच ते स्वतःची गाडी घेऊन
आणि बाकी कोणाच्या पायात अडकून न राहता तिघांनीच असा ठरला.ठरल म्हणजे नुसता
जायचं ठरलं रूट तारखा काहीच न्हवत.मग सुरु झालं मिशन Rout Fixing!! मग
मी,आई,बाबा यांचा तिघांचाची वेगवेगळा अभ्यास सुरु झाला.मधेच असं ठरलं की ट्रीपचा
शेवट पुण्यात करायचा म्हणजे माझं पार्सल तिथे उतरवता येईल.कॉलेज २१ पासून सुरु
होणार होता म्हणून म तारखा ठरल्या १७,१८,१९,२० नोव्हेंबर.कुठे जायचं याचा अजून
काही पत्ता न्हवता.पुण्यात शेवट करायचा ठरल्यावर कोस्टल कर्नाटक आणि बदामी-हंपी हे
पर्याय आले तसेच लगेच परत गेले.शेवटी रूट ठरला.आणि असा ठरलं कि हा फक्त रूट तसाच
ठेवायचा,पण कुठे राहायचं,कुठे थांबायचं हे ‘मनाचा ब्रेक,उत्तमब्रेक’या तत्वावर ठरवायचं.
         १७ ला सकाळी ६ ला सूर्यदेव पूर्वेकडून पश्चिमेकडे यायला निघाले आणि आम्ही जरासे
पूर्वेकडे निघालो.कादिवलीतून आवाशीमार्गे लाटवणहून डायरेक्ट वरंध घाटाच्या रस्त्याला
लागलो.वरंधा घाटातून जायचं म्हटल्यावर नाश्ता कुठे करायचा हा प्रश्नच नाही.८ साडे ८
वाजता मस्तपैकी गरम गरम भजी,चहा झाली आणि पुढील मार्गक्रमण सुरु झालं.भोर हून
हायवे ला लागून तसेच लगेच आत नारायणपूर च्या दिशेने निघालो.प्रतिबालाजी ऑगस्ट
मधेच झाला असल्याने रस्त्यातूनच नमस्कार केला.पुरंदरच्या बाजूबाजूने जाणाऱ्या रस्त्याने
नारायणपूर ला पोचलो.एकमुखी दत्त आणि त्याच्याच जवळ असलेल्या नारायणेश्वराच दर्शनघेतलं.नारायणेश्वराच देऊळ पूर्ण दगडी,हेमाडपंथी.अतिशय सुंदर!!  
+
 देवळाबाहेर उभे पेरू घेतले.गुगल गुरूंना पुढच्या टप्प्याचा रस्ता विचारला आणि मार्गस्थ
झालो.नारायणपूरहून शिंदवणी घाटातून उतरून उरळी कांचन ला सोलापूर रोड ला
लागलो.गुगल गुरु चालूच होते.२:१५ ला पहिला टप्पा गाठू असं त्याचं मत होतं.हायवे सोडून
डावीकडे वळल्यावर आई-बाबांचा गुगल गुरूंवरचा विश्वास ढळू लागलं.म रस्त्यावरच्या
माणसांना विचारल्यावर त्यांची  खात्री पटली.त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल
चालू होती.अचानक दोन फाटे आले.एकाठिकाणी आत वळणार तेवढ्यात बाजूने जाणारे एक
काका मदतीला धावून आले,”सिद्धटेक ला चाल्ला ना??माझ्या मागन चला.”त्यांच्या मागून
गेल्यावर एका ठिकाणी थांबले आणि पुढे कसं जायचं ते सांगितलं.”पासिंग वेगळा बघितलं
तेवाच ओलीखला सिद्धटेक ला जाणार असनार.आता हिथून स्ट्रेट जा.म डाव्या हाताला डांबरी
लागल तिथे लेफ्ट हाणायचा आणि स्ट्रेट जायचं एकदम.म पूल लागल पलिकड गेलं कि त्ये
सिद्धटेक.” एवढ म्हणाले आणि जिथून आलो त्याच रस्त्याने परत गेले.ते काही सिद्धटेक ला
चालले न्हवते,का त्यांच काही रस्त्यात कुठे काम न्हवत.फक्त आम्हाला रस्ता दाखवायला
त्यांनी त्यांची वाट वाकडी केली.आम्ही पण त्यांना धन्यवाद वगैरे म्हणालो आणि त्यांनी
सांगितलेल्या रस्त्याने निघालो.म डांबरी लागल्यावर लेफ्ट हाणला.सिंगल डांबरी रोड
होता.दोन्ही बाजूला शेती होती.ह्या रस्त्याला बहुतेकशी शेती फुलांची होती.बघायला फारच
भारी वाटत होत.केवळ हाच रस्ता नाही तर जेवढे फिरलो तिकडे तिकडे या वर्षीच्या चांगल्या
पावसामुळे सुजलाम सुफलाम शेती दिसत होती.नागरलेली काळीभोर जमीन सांगत होती
काहीही पेरा फोफवता कि नाही ते बघा.ऊस केवढातरीच.त्यामुळे शेतात दिसत होती ऊस
तोडणी कामगारांची पालं,आणि रस्त्यावर ट्रक-ट्रक्टर ऊस साखर कारखान्यात घेऊन जाणारे.
       सिद्धटेक ला पोचल्यावर आमचा गर्दीचा अंदाज पूर्ण खोटा ठरला.आम्हाला वाटेला 
चतुर्थी असल्याने बर्यापैकी गर्दी असेल.पण गर्दी अशी काहीच नाही.म पोटोबाच्या आधी 
सिद्धिविनायकाची पूजा केली.दर्शन झाल्यावर आईचं नेहमीच shopping म्हणजे काहीतरी 
नवीन दिसेल असा दिवा घायचा.एका दुकानात शिरल्यावर आईला एक कुंकवाचा करंडा 
type मध्ये काहीतरी मिळालं.बघून कळत होतं जुनं आहे.style मस्तच आहे.बघताच 
आवडलं.कोणाच्या तरी घरी असणार,एवढी सुंदर,जुनी गोष्ट ज्याने विकली असेल त्याची 
अरसिकता आणि दुर्दैव त्याचंच!! ही खरेदी झाल्यावर उदरभरणाची सोय बघायला सुरवात 
केली.जवळच एका ठिकाणी पिठलं-भाकरीचा बोर्ड लावला होता.एक आजीबाई गरम गरम 
भाकऱ्या,पिठलं आणि ठेचा असं ताट वाढत होत्या.तिथे जेवलो.A1 जेवण एकदम.:-) जेवून 
झाल्यावर पुढच्या टप्प्याच्या दिशेने जाऊ लागलो.

        पुढचा टप्पा होता अंबाजोगाई. ३:३० च्या सुमारास सिद्धटेक हून निघाल्यावर 
अंबाजोगाई ला पोचायला उशीर होईल,आणि दिवसभर गाडी चालवून बाबांना सुद्धा कंटाळा 
आला होता.सो,वाटेत बार्शी ला राहायचं ठरलं आणि पुढे निघालो.नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूला 
जबरदस्त शेती,आणि रस्त्यावर ऊसवाहू ट्रक.बार्शी ला राहायचं ठरल्याने आता काही घाई 
न्हवती.सिद्धटेक-करमाळा रोडवर एक बोर्ड दिसला.अंतर दाखवणारा मोठा.त्यावर ‘या देवी 
सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थित:’ श्लोक दिसला.म्हणालो इथे कुठे अचानक श्लोक,जवळच देवीचं 
देऊळ असणार.जरा पुढे गेलो तर राशीन गाव लागलं.गावात उजव्याबाजूला जगदंबा देवीचं 
देऊळ होतं.१७०३-०४ च्या सुमारास पेशव्यांच्या एका सरदाराने बांधलेलं.गाभारा सोन्याने 
मढवलेला.आत दोन देवी होत्या.सुंदर!!देऊळाचं वैशिष्ट्य म्हणजे देउळासामोरची दिपमाळ.या 
दिपामालेच्या आत जाता येतं.आत गेल्यावर तिथून वरची अर्धी दिपमाळ आतून हलवता 
येते.ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचे चमत्कार!! 
    राशीन हून निघाल्यानंतर करमाळ्याच्या आधी अगदी रस्त्यालाच लागून एक साखर 
कारखाना लागला.मी आणि आई ने साखर कारखाना कधीच बघितलं न्हवता आणि बाबांनी 
सुद्धा फार आधी कधीतरी बघितलेला.म साखर कारखाना बघता येईल का वगैरे विचारून 
भैरवनाथ साखर कारखान्यात शिरलो.एका बाजूला १ क्रेन ट्रक मधून ऊस उचलून एका 
मोठ्या सुपासारख्या दिसणाऱ्या भांड्यात टाकत होती.त्या भांड्यातून ठरावीक वेळाने ऊस 
कन्व्हेयर बेल्ट वर ढकलला जात होता.तो ऊस नंतर दिसला तो डायरेक्ट भुकटी स्वरुपात.हा 
एवढा सगळा ऊस पिळवटून निघणारा सारा रस एका मोठ्या अवाढव्य टाकीत जमा होत 
होता.या च रसातला चांगला रस साखर करायला एका टाकीत तर कमी प्रतीचा रस दारू 
करायला दुसऱ्या टाकीत साठवला जात होता.साखर तयार करण्यासाठीचा रस उकळत 
उकळत पुढे चाल्लेला.ह्या रसावर पुढे प्रक्रिया होते आणि साखर तयार होऊन खाली 
पडते.मात्र नेमक्या त्या दिवशी ही प्रक्रिया करणाऱ्या मशीन मध्ये काहीतरी बिघाड आला 
होता.हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या प्रेशर मध्ये तिथला इंजिनियर आणि 
टीम टेन्शन मध्ये दिसत होती.कारण कारखान्यात काही एक मशीन बंद राहिली की मागे 
सगळा साठत जात.टाकीत जमा झालेला रस जास्तीतजास्त ११ तास ठेवता येतो नंतर मात्र 
तो सोडून द्यावा लागतो,त्यातला साखरेचा प्रमाण कमी होत.साखर कारखाना बघून 
झाल्यावर करमाळा मार्गे बार्शीला गेलो.आणि पहिला मुक्काम पडला.आतापर्यंत 
रत्नागिरी,रायगड,पुणे,नगर,सोलापूर,उस्मानाबाद आणि परत सोलापूर एवढ्या जिल्ह्यात 
फिरलो होतो.पहिल्यादिवशी साधारण ४५० km चा टप्पा झाला होता.
+
2 comments:

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध ...