Skip to main content

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!


           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.
           


                       गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग्रामीण भागात ३२ रु. प्रतिदिन ह्या पेक्षा कमी खर्च असेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे मानण्यात येते.भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २१.९% नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत.ही संख्या प्रचंड आहे.गरिबी कमी करणं हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे.ह्या आव्हानाचे,समस्येचे उत्तर हे सखोल अभ्यासातूनच शोधले पाहिजे.उत्तर हे कायमस्वरूपी असणे महत्वाचे आहे.नाहीतर हा भस्मासूर भारताच्या विकासात कायमस्वरूपी अडथळा होऊन बसेल.
               कोणत्याही समस्येचा अभ्यास करताना त्याच्या कारणांचा अभ्यास महत्वाचा ठरतो.गरिबीची अनेक कारणे आहेत.बेकारी,शिक्षणाचा ,आरोग्याचा अभाव ही महत्वाची कारणे आहेत.गरिबी ही चक्राकार समस्या आहे.वर म्हटल्याप्रमाणे गरिबीची कारणे हीच गरिबीचे परिणाम ठरतात.गरिबीच्या अनेक कारणांपैकी आपली भरमसाट लोकसंख्या हे एक महत्वाचं कारण आहे.लोकसंख्या ही देशाची शक्ती आहे वगैरे जरी खरं असला तरी प्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या ही नक्कीच देशहिताची नाही.ही लोकसंख्या निरनिराळ्या समस्या निर्माण करते.लोकसंख्या हे बेकारी मागील एक महत्वाचे कारण आहे पण एकमेव नाही.शिक्षणाचा अभाव देखील बेकारीमध्येच परावर्तित होतो.भारतात कधी कधी अशी स्थिती दिसते की कंपन्यांमध्ये कामगार कमी पडत आहेत पण योग्य माणसे मिळत नाहीत.अशी हि स्थिती दिसते की जे काम करायला १ माणूस पुरु शकतो ते काम १० जण करतात.शेती मध्ये हे बऱ्याचदा बघायला मिळतं.ह्यामुळे १ ला मिळणाराला मोबदला १० जणांमध्ये विभागला जातो.ह्यामुळे कोणीच गरिबीतून बाहेर येऊ शकत नाही.शिक्षणाच्या अभावाप्रमाणेच आरोग्याचा अभाव हे देखील एक महत्वाचे कारण आहे.आरोग्याचा अभाव कामाचे तास,दिवस यांवर परिणाम करतो.शिक्षणाच्या अभावामुळे आधुनिक ज्ञान नसल्याने व आरोग्याच्या अभावामुळे शारिरीक स्थिती मजबूत नसल्याने कार्यक्षमता कमी होते.कार्यक्षमता कमी त्यामुळे उत्पादकता कमी,उत्पादन कमी त्यामुळे प्राप्ती कमी,प्राप्ती कमी त्यामुळे खर्च कमी आणि बचत त्याहूनही कमी!!ही सायकल चालू राहते.जे काही उत्पन्न मिळतं ते अन्न,वस्त्र ,निवारा ह्या मुलभूत गरजा भागविण्यात खर्च होतं आणि शिक्षण आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा ज्या गरिबीतून बाहेर काढण्यात मदत करू शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.व्यसनाधीनता हे देखील मोठे कारण आहे.दारू,अमली पदार्थ ह्यांच व्यसन पैसे तर संपवतच त्याच बरोबर आरोग्यही बिघडवतं.सर्वात म्हणजे ह्याचा मोठा परिणाम मुलांवर होतो.शिक्षणाचा अभाव असतो,गरिबीमुळे मजुरी करावी लागते.अश्या स्थितीत मुले लहान वयापासूनच व्यसनाधीन होतात.अजून एका पिढीची गरिबी निश्चित होते.
           काही दिवसांपूर्वी राहुल गांधी 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' असं म्हणाला होता.हे मत मात्र त्याच १००% बरोबर आहे.भारतामध्ये गरिबी ही केवळ सरकारी धोरणांमधील त्रुटीमुळे नाही तर त्या (गरीब) व्यक्तींच्या स्वभावामुळे व निष्क्रियतेमुळे ही आहे.'NO ONE IS POOR BY CHOICE!' हे जरी खर असलं तरीही माणसं निष्क्रियतेमुळेही गरीब राहतात हे सत्य आहे.शिक्षण नाही,एखाद तंत्र नाही त्यामुळे काम नाही अश्या परिस्थितीत एखादं तंत्र शिकून ते काम सुरु करणारी काही माणसं दिसतात पण बहुसंख्य सिग्नलवर,रस्त्यावर,मंदिरांजवळ भीक मागताना दिसतात किंवा आपल्या योग्यतेपेक्षा प्लंबर,सुतार,इलेक्टरेशीअन,वेटर इत्यादी काम कमी आहेत समजून बेकार बसून राहतात.ह्यामुळे इतका विरोधाभास दिसतो की एकाच दिवशी वर्तमानपत्रात बेरोजगारांचा आकडा व कामगार न मिळाल्याने कंपन्या बंद अश्या दोन्ही बातम्या येतात. ह्याचबरोबर कष्ट करण्यापेक्षा easy money मिळवण्याकडे कल असतो.



          
            गरिबीची कारणे शोधत बसलो तर वेगवेगळ्या प्रकारे ती दिसत राहतील आणि परिणाम हे तर वेगवेगळे आव्हान आहे.गरिबी हे अनेक समस्यांचे महत्वाचे कारण आहे.त्यामुळे गरिबी निर्मूलन हे एक महत्वाचे काम आहे आणि हे काम एकाच बाजूने नाही तर अनेकविध बाजूंनी,अनेकांच्या प्रयत्नांनी झाले पाहिजे.स्वातंत्र्य मिळाल्या पासून ह्या साठी अनेक प्रयत्न झाले.'गरिबी हटाव' झालं,पंचवार्षिक योजनांच उद्दिष्ट गरिबी निर्मुलन झालं,राज्य-केंद्र सरकारांकडून अनेक योजना जाहीर झाल्या; परिस्थिती बदलली हे सत्य आहे पण अजूनही अनेक पाऊले पुढे जायचं आहे.

भारतातील गरिबीची स्थिती!





                 हल्लीच्या काळातील सरकारे ही नुसतीच पोलीस स्टेट नाहीत तर ही कल्याणकारी राज्य आहेत.राज्यांना अनेक काम करावी लागतात.गरिबीचे चक्र तोडण्यामध्ये सरकारला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.ह्यामध्ये सध्या सरकार शिक्षण,आरोग्य,अन्न पुरवठा इत्यादी क्षेत्रात काम करत आहे,बाकी काही क्षेत्रात सबसिडी देते.सरकार प्रत्येक वेळी गरिबी हटवण्यासाठी निरनिराळे पर्याय आजमावत असतात.सरकारने फक्त आर्थिक गरिबी वर लक्ष  भागणार नाही तर स्वभाव आणि निष्क्रियतेवरही उपाय योजले पाहिजेत. सर्वात महत्वाच म्हणजे सरकार काय ते करेल हा ऍटिट्यूड बदलून व्यक्तिगत अथवा संघटनात्मक हातभार प्रत्येकाने लावला पाहिजे.गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही गोष्ट आयती देऊ नये.त्याने विना कष्टच मिळतंय तर कष्ट का करायचे ऍटिट्यूड तयार होतो.इंसेन्टीव्ह ठेवले तर काम सोपं आणि जलद गतीने होईल.मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसावी तर ती आरोग्य,शिक्षण इत्यादी क्षेत्रात मूल्यवर्धन करणारी असावी.गरीब वस्त्यांमध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे हाती आलेला पैसा कसा?कुठे? खर्च करावा,गुंतवावा ह्या बद्दलच अज्ञान.एकूणच आर्थिक निरक्षरता ही वेगळीच समस्या आहे.त्यातून गरीब वर्गात ती समस्या ठळक जाणवते.राहण्याच्या घराची स्थिती यथातथा,स्वछता नाही पण घर बाहेर २-व्हीलर असते,त्यावरून अतिशय भयानक हेअर स्टाईल फिरणारी मुलं असतात;घरात TV असतो.पण हेच पैसे घर नीट करायला,शिक्षणासाठी,आरोग्यासाठी वापरता येतील हे कळत नाही किंवा कळूनही प्राधान्यक्रम चुकीचे असतात.ह्या गोष्टींमध्ये बदल करायलाही सरकारने आणि त्यापेक्षाही जास्त या विषयावर काम करणाऱ्या NGOs नी केलं पाहिजे.
            देशांचा सर्वांगीण विकास Human Development Index(HDI) मध्ये मोजतात.हा मोजताना सरासरी आयुर्मान,सरासरी शालेय वर्षे व दरडोई उत्पन्न या गोष्टी विचारात घेतल्या जातात. गरिबी ह्या तिन्ही गोष्टींशी  directly related आहे.त्यामुळे देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर गरिबी हटाव कार्यक्रम अधिक जोमाने,डोळसपणे हाती घ्यायला हवा,पूर्णत्वाला न्यायला हवा.यानेच आपल्या देशाचा विकास होईल,यानेच आपल्या देशासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होईल.

United Nations Sustainable Development Goals मध्ये हे गरिबी निर्मूलन हेच प्रथम उद्दिष्ट आहे.आपणही प्रथम आपल्या देशातून गरिबी निर्मूलन करून 'वसुधैव कुटुंबकम' हे वाक्य जपून सर्व जगाची मदत करूया.या संदर्भात प्रत्येकाला काय करता येईल या वर UN ने मार्गदर्शन करून ठेवलेच आहे आपण फक्त आता त्यावर मार्गक्रमण करू.



                                                           ©श्रवण दांडेकर 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के