Skip to main content

Posts

Showing posts from December, 2017

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध झेलावी लागली. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांनी भारत अनेक क्षेत्रात समर्थपणे उभा आहे. सुरक्षाक्षेत्रातही भारत मागे नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला ज्याप्रमाणे बाह्य संकटांपासून रक्षण करायचे असते त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता यांची ही काळजी घ्यावी लागते;म्हणजेच अंतर्गत सुरक्षा सांभाळावी लागते. भारताने ४ युद्ध सक्षमपणे पेलली,सैन्याच्या मदतीने सीमा सुरक्षित केल्या,सैन्य अद्ययावत ठेवलं. भारतने ह्या बाह्य आक्रमणांपासून स्वतःचा भक्कम केलाच   पण त्याच बरोबर आपल्या देशाला अंतर्गत समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. दहशतवाद,नक्षलवाद,फुटीरतावादी हिंसक चळवळी अश्या अनेक समस्या भारतासमोर आल्या.अजूनही अनेक अंतर्गत समस्यांना भारत तोंड देत आहे. आताच्या काळामध्ये  समस्यांची जटीलता वाढली आहे कारण कोणतीच समस्या ही केवळ अंतर्गत किंवा बाह्य राहिली नाहीये. अंतर्गत आणि बाह्य धोके हे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच अंतर्गत समस्यांची व्याप्