दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ...
नमस्कार!! "दिसामाजी काहीतरी लिहावे" हा समर्थांचा उपदेश.हात लिहता आणि मेंदू विचारता राहावा म्हणून हा ब्लॉग सुरु केला.या ब्लॉग ला कोणतीही बंधनं नाहीत.या ब्लॉग मध्ये साधारणतः राजकीय,आर्थिक,सामाजिक,साहित्य-चित्रपट,प्रवासवर्णन आणि अशा अनेक सुचतील त्या विषयांवर लिहेन. धन्यवाद!!