गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!! ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक ह...
नमस्कार!! "दिसामाजी काहीतरी लिहावे" हा समर्थांचा उपदेश.हात लिहता आणि मेंदू विचारता राहावा म्हणून हा ब्लॉग सुरु केला.या ब्लॉग ला कोणतीही बंधनं नाहीत.या ब्लॉग मध्ये साधारणतः राजकीय,आर्थिक,सामाजिक,साहित्य-चित्रपट,प्रवासवर्णन आणि अशा अनेक सुचतील त्या विषयांवर लिहेन. धन्यवाद!!