भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात. गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषां...
नमस्कार!! "दिसामाजी काहीतरी लिहावे" हा समर्थांचा उपदेश.हात लिहता आणि मेंदू विचारता राहावा म्हणून हा ब्लॉग सुरु केला.या ब्लॉग ला कोणतीही बंधनं नाहीत.या ब्लॉग मध्ये साधारणतः राजकीय,आर्थिक,सामाजिक,साहित्य-चित्रपट,प्रवासवर्णन आणि अशा अनेक सुचतील त्या विषयांवर लिहेन. धन्यवाद!!