Skip to main content

Posts

Showing posts from 2017

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                                            स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध झेलावी लागली. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांनी भारत अनेक क्षेत्रात समर्थपणे उभा आहे. सुरक्षाक्षेत्रातही भारत मागे नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला ज्याप्रमाणे बाह्य संकटांपासून रक्षण करायचे असते त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता यांची ही काळजी घ्यावी लागते;म्हणजेच अंतर्गत सुरक्षा सांभाळावी लागते. भारताने ४ युद्ध सक्षमपणे पेलली,सैन्याच्या मदतीने सीमा सुरक्षित केल्या,सैन्य अद्ययावत ठेवलं. भारतने ह्या बाह्य आक्रमणांपासून स्वतःचा भक्कम केलाच   पण त्याच बरोबर आपल्या देशाला अंतर्गत समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. दहशतवाद,नक्षलवाद,फुटीरतावादी हिंसक चळवळी अश्या अनेक समस्या भारतासमोर आल्या.अजूनही अनेक अंतर्गत समस्यांना भारत तोंड देत आहे. आताच्या काळामध्ये  समस्यांची जटीलता वाढली आहे कारण कोणतीच समस्या ही केवळ अंतर्गत किंवा बाह्य राहिली नाहीये. अंतर्गत आणि बाह्य धोके हे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच अंतर्गत समस्यांची व्याप्

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग

समस्या भारतासमोरच्या!

              भारत स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली.७० वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली.१५ ऑगस्ट १९४७ च्या तुलनेत आपण बरेच पुढे आलो आहोत पण अजूनही अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत.यातील अनेक समस्यांशी अनेक वर्ष सामना करूनही अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.याची कारणे काय?समस्याच मोठ्या जटील आहेत?की त्या सोडवण्यात प्रयत्न कमी पडतायत?की आपण नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखल्याच नाहीयेत?की वैयक्तिक स्वार्थ साठी या समस्या तश्याच कुजवत ठेवायच्या आहेत?                 भारतासमोरच्या नेमक्या समस्या कोणत्या याचा विचार करताना मला अनेक समस्या सुचल्या.यातील काही एकमेकांशी जोडता येतील,अनेकवेळा एका समस्येचं मूळ दुसर्या समस्येत सापडेल.काही खूप महत्वाच्या,काही कमी महत्वाच्या छुल्लक वाटतील पण ह्या सर्व समस्या सुटतील तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.           ह्या समस्या लिहताना कोणताही criteria ठेवलेला नाही.Brain Storming करत सुचत गेल्या तश्या लिहिल्या आहेत.            भारतासमोरच्या समस्या!!    1. गरिबी. 2. आरोग्य. 3. शिक्षण. 4. आर्थिक साक्षरता. 5. राजकीय साक्षरता.

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के